कारण जाणून घेतल्यावर व्हाल चकित
21 वर्षीय एका युवतीने आपण श्वानाच्या पिंजऱ्यात झोपत असल्याचा खुलासा केला आहे. तिला स्वत:च्या क्वीनसाइज बेडवर झोपण्याऐवजी श्वानाच्या पिंजऱ्यात झोपणे अधिक आरामदायी वाटते. तिने हा पिंजरा अत्यंत उत्तमप्रकारे सजविला आहे. त्यात तिने ब्लँकेट अन् टेडी बियर ठेवले आहेत. अजब कृत्य करणाऱ्या या युवतीचे नाव लिया पार्कर आहे.
लिया पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डरने (पीटीएसडी) पीडित आहे. ती दैनंदिन जीवनाच्या तणावापासून वाचण्यासाटी आणि पीटीएसडी वाढल्यावर स्वत:ला शांत करण्यासाठी केनेल म्हणजेच श्वानाच्या पिंजऱ्याचा वापर करते. श्वानाच्या पिंजऱ्यात झोपल्यावर मनाला आल्हाददायक वाटते. ही माझ्यासाठी सर्वात आरामदायी जागा असल्याचे लियाने सांगितले आहे.

दररोज रात्री झोपण्यासाठी मी श्वानाच्या पिंजऱ्यात शिरते. कधीकधी पूर्ण दिवस या पिंजऱ्यात आराम करण्याचा आनंद घेते असे ती सांगते. अमेरिकेत राहणारी लिया सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय आहे. तिच्याकडून पोस्ट करण्यात आलेल्या अनेक छायाचित्रांमध्ये केनेलसमोर एक मोठा बेड दिसून येतो, ज्यावर ती बसलेली असते, परंतु झोपण्यासाठी ती श्वानाच्या पिंजऱ्याचाच वापर करते.
सोशल मीडियावर पार्करचे हजारोंच्या संख्येत फॉलोअर्स आहेत. येथे ती नेटिझन्ससोबत स्वत:च्या लाइफस्टाइलसंबंधी मुक्तपणे चर्चा करते. ती लोकांच्या प्रश्नांना उत्तर देखील देते. तसेच हा प्रकार कशामुळे सुरू झाले हे देखील स्वत:च्या फॉलोअर्सना वारंवार सांगत असते.
3 वर्षांपासून पिंजऱ्यात झोपतेय
घराच्या तणावयुक्त वातावरणात मी लहानाची मोठी झाले. छोट्या जागा म्हणजेच कपाटांमध्ये मी आराम शोधायचे. याचमुळे मी श्वानाच्या पिंजऱ्यात राहण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 18 व्या वर्षांपासून मी श्वानाच्या पिंजऱ्यात झोपत आहे. या सवयीपासून लवकर मुक्तता मिळविण्याचा माझा हेतू नसल्याचे तिचे सांगणे आहे. लिया नियमित स्वरुपात स्वत:च्या या पिंजऱ्यातील बेडचे व्हिडिओ शेअर करत असते.









