जगात अजब प्रकारचे लोक असतात. काही लोक स्वत:साठी मोठा बेडरुम इच्छित असतात. परंतु एक युवती लहानपणापासून जिवंतपणी शवपेटीत झोपण्याचे स्वप्न बाळगून आहे. सॅड स्पाइस नावाच्या एका टिकटॉक युजरने स्वत:च्या बेडरुमचे अजब छायाचित्र शेअर करत मी सर्वसामान्य लोकांप्रमाणे बेडवर झोपत नसल्याचे सांगितले आहे. तिने स्वत:च्या झोपेसाठी एक खास शवेपटी तयार करवून घेतली आहे. ही शवपेटी मृतांवर अंत्यसंस्काराकरता वापरण्यात येणाऱ्या शवपेटींपैकी एक आहे.
टिकटॉकवर 6 लाख फॉलोअर्स असणाऱ्या या युवतीने रितसर एक व्हिडिओ क्लिप अपलोड करत स्वत:च्या खोलीत एक खरीखुरी शवपेटी ठेवल्याचे दाखवून दिले आहे. तिने चेटकिणींप्रमाणे स्वत:चे दात देखील मोठे करविले आहेत, तसेच तिने खोलीत चेटकिणीचा भास व्हावा अशी सजावट केली आहे.
तिने स्वत:च्या झोपण्याच्या सेटअपमध्ये 6 फूट 8 इंचाच्या शवपेटीचा समावेश केला आहे. ही शवपेटी पूर्णपणे आरामदायी आहे, कारण यात 4 इंचाचा मेमोरी फोम आहे असे तिचे सांगणे आहे. ही मुलगी शवपेटी कधीच बंद करत नाही.
वयाच्या 14 व्या वर्षापासून शवपेटीत झोपण्याचे माझे स्वप्न होते. आईवडिलांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. परंतु आता मीच शवपेटी खरेदी केली आहे. याच्या मदतीने मी वाईट गोष्टींपासून वाचते आणि यात लपून राहते असे तिचे सांगणे आहे. या युवतीच्या सोशल मीडिया अकौंटवर लाखो फॉलोअर्स आहेत.









