Pune Crime News : पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कार केल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्यास पोलीसांनी अटक केले आहे. फईम नईम सय्यद (वय ३३, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली यानंतर त्याला अटक करण्यात आली.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, पिडित तरुणी पुस्तके खरेदीसाठी पुण्यात आली होती. यावेळी बसमध्ये फईमची आणि तिची ओळख झाली. दोघांनीही एकमेकांना कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्यानंतर मोबाइलवरुन दोघांमधील संपर्क वाढला. गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी ती पुण्यात आली होती.तिने पुस्तके खरेदी केली.त्यानंतर तिने फईमशी संपर्क साधला. तेव्हा फईमने तिला जेवायला जाऊ असे सांगून जंगली महाराज रस्त्यावरील एका उपहारगृहात नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तरुणीला एका लॉजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.तेव्हा त्याने तिचा व्हिडिओ बनवला आणि फोटोही काढले. त्यानंतर त्याने तरूणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पैसे दे नाहीतर सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत तिच्याकडून १६ लाख ८६ हजार रुपये उकळले. त्यानंतरही तो तरुणीला धमकावत होता.त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्या तरूणीने त्याला पैसे देण्यासाठी एका बँकेकडून कर्ज काढले.
Previous Articleसिंधुरत्न योजनेतील निकषांंमध्ये सुधारणा करा! रामेश्वर मच्छीमार सहकारी संस्थेची मागणी
Next Article सरकारने गोवा जणू विक्रीस काढला








