विमानासोबत विवाह करण्याच्या तयारीत
हे जग चित्रविचित्र लोकांनी भरलेले आहे. आता एका अशाच युवतीला विमानावर प्रेम जडले असून ती त्याच्यासोबतच राहते. मुलीचे खाणे-पिणे आणि बहुतांश वेळ विमानासोबतच जातो. ही मुलगी विमानाच्या प्रतिकृतीसोबत राहत आहे.
23 वर्षीय या युवतीचे नाव सारा रोडो असून तिला विमानासोबत राहणे पसंत आहे, परंतु बोइंग-737 बद्दल तिला अधिकच आत्मियता आहे. प्रत्यक्षात साराला निर्जीव वस्तूंबद्दल प्रचंड प्रेम असल्याने ती विमानाकडे अधिकच आकर्षित झाली आहे.

साराची ‘ऑब्जेक्टम सेक्सुअल’ पर्सनॅलिटीच्या स्वरुपात ओळख निर्माण होते. अशाप्रकारच्या पर्सनॅलिटीचे लोक निर्जीव वस्तूंबद्दल आकर्षित होतात. सारानुसार तिचे बोइंग-737 विमानाबद्दल प्रेम खूपच अधिक आहे. साराने खऱया आयुषत काही लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मला केवळ एअरलाइनशी निगडित व्यक्तीच समजून घेऊ शकतो असे तिचे म्हणणे आहे.
साराने स्वतःच्या विमानाचे नाव ‘डिकी’ ठेवले आहे. तिच्या बेडला विमानानेच व्यापले आहे. साराने स्वतःच्या शरीरावर बोइंग-737 चे टॅटूही काढून घेतले आहेत. तसेच ती स्वतःच्या विमानासोबत विवाह करण्याचा विचार करत आहे.
सारा मूळची जर्मनीच्या डॉर्टमुंड शहराची रहिवासी आहे. ती बोइंग-737 च्या विमानाद्वारे प्रवास करण्यास प्राधान्य देते. यामुळे तिला स्वतःच्या प्रेमासोबत अधिक काळ घालविता येतो. बोइंग-737 च्या प्रत्येक पैलूला ती पसंत करते. परंतु तिला या विमानाचा आकार, इंजिन आणि पंख पाहण्यास अत्यंत चांगले वाटते. या विमानाचा आवाज ऐकण्यासाठी ती अनेकदा या विमानातून प्रवास करत असल्याचे तिने सांगितले आहे.









