बेळगाव : बिजगर्णी, ता. बेळगाव येथील एक तरुणी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या वडिलांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. साक्षी शिवाजी पाटील (वय 18) असे तिचे नाव आहे. 5 फूट 3 इंच उंची, अंगाने सडपातळ, गहू वर्ण असे तिचे वर्णन असून घराबाहेर पडताना या तरुणीने हिरव्या व पिवळ्या रंगाचा चुडीदार परिधान केला आहे. तिचे वडील शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सोमवार दि. 1 मे रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत घरात कोणालाही न सांगता ही तरुणी आपल्या घराबाहेर पडली आहे. या तरुणीविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleअखेर आरटीओ जुनी इमारत भुईसपाट
Next Article काँग्रेसचे धोरण ‘भ्रष्टाचार प्रथम’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









