कोल्हापूर प्रतिनिधी
नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून संभाजीनगर येथील तरुणाने खणीत उडी मारून आत्महत्या केली. शिवम अनिल सावंत (वय 26 रा जुनी मोरे कॉलनी संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळ पासून तो घरातून बेपत्ता होता, मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह खणीत मिळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम सावंत हा मेकॅनिकल इंजिनिअर चे शिक्षण घेऊन एका खाजगी कंपनीत नोकरीस होता. संभाजीनगर येथे घरी आई, आजी, भाऊ, बहीण कुटुंबासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून तो दुसऱ्या नोकरीच्या शिधात होता. सोमवारी सायंकाळी घरातून बेपत्ता झाला. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह इराणी खाणीत आढळून आला. जुना राजवाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सीपीआर रुग्णालयात शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शिवम सावंत यांच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याच्या आई आरती सावंत यांनी अत्यंत कष्टाने दोनही मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घरामध्ये त्यांचे इस्त्रीचे दुकान आहे. यामध्ये कष्ट करून त्यांनी दोनही मुलांना लहानाचे मोठे केले. मात्र शिवमने आत्महत्या केल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला.









