सावंतवाडी / प्रतिनिधी
कोलगाव आयटीआयजवळील काजरकोंड येथील नाल्यात कुजलेल्या अवस्थेत कोलगाव चव्हाणवाडी येथील संतोष वासुदेव चव्हाण {४२} या तरुणाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. चार मे रोजी सकाळी नऊ वाजता मोलमजुरीसाठी तो घरातून बाहेर पडला होता .तो चार-पाच दिवसांनी घरी येत होता. चार दिवस उलटून गेल्याने त्याचे नातेवाईक शोध घेत होते. सोमवारी कोळगाव नाल्याच्या परिसरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह ग्रामस्थांच्या नजरेस पडला. तात्काळ या घटनेची माहिती सचिन राणे यांनी पोलिसांना देतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर याची माहिती चव्हाण कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मृतदेह संतोष चव्हाण यांचा असल्याचे निष्पन्न झाले.









