कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील एका उपनगरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अजय अरूण पाटील (वय 26, रा. 14 वी गल्ली, दौलतनगर, कोल्हापूर) या तरूणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.
संशयित अजय पाटील या तरूणाची पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर संशयिताने तिला स्वत:च्या घरी आणले. घरी कोणी नाही हे पाहून पुन्हा तिच्यावर त्याने अत्याचार केला. याची माहिती पीडित मुलीच्या नातेवाईकांना समजली. त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन संशयित अजय पाटील विरोधी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक केली.