A young man from Malewad committed suicide by hanging himself!
मळेवाड केरकरवाडी येथील राजेश प्रभाकर केरकर (वय 30) या युवकाने घराशेजारील झाडाला सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर आरोंदा दूरक्षेत्रचे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनकरिता मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. राजेश केरकर हा उत्तम रंगकाम कारागीर होता.
सावंतवाडी / प्रतिनिधी









