प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे पुलानजीक कोंडीत माजगाव तांबळगोठण येथील निखिल प्रकाश सूर्यवंशी ( वय 48 )हा तरुण बुडाला. मंगळवारी माजगाव येथील युवक पार्टी करण्याच्या उद्देशाने नदीवर आले होते. पार्टी आटोपून घरी जात असताना निखिल पाय घसरून खाली पडला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र , पाणी खूप असल्याने त्याला वाचविण्यात अपयश आले. त्यानंतर स्थानिक युवकांनी त्याचा मृतदेह बाहेरून काढला असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह बांदा येथे नेण्यात आला.निखिल हा माजगाव येथील माजगाव नाला नवरात्रोत्सव मंडळाचा अध्यक्ष होता. पुढील तपास बांदा पोलीस करणार आहेत.
Previous Articleमासे पकडायला गेला अन् घात झाला !
Next Article सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस









