सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडीतील खळबळजनक प्रकार
गुप्तधनाचे आमिष दाखवून एका महिलेला एका युवकाकडून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सावंतवाडीत झाला आहे .याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली आहे .आठ दिवसापूर्वी यासंदर्भात तक्रार अर्ज देण्यात आला .मात्र या युवकाकडून संबंधित महिलेचे पैसे देण्यास युवकाकडून असमर्थता दर्शवण्यात आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले .संबंधित युवक गावठी औषधे देतो. या माध्यमातून त्याचा रुग्णांशी संपर्क येतो . दरम्यान रुग्णाकडून माहिती घेऊन त्यांना गुप्तधनाचे आमीष युवकाकडून दाखवण्यात येते. ही महिलाही गुप्तधनाच्या आमिषाला बळी पडली. या महिलेला तुझ्या माहेरी घरात गुप्तधन आहे.उत्खनन केल्यानंतर ते सापडेल असे सांगून या महिलेकडून लाखो रुपये उकळले .या महिलेने अनेकांकडून गुप्तधनापोटी पैसे कर्जाऊ घेतले आणि हे पैसे या युवकाला दिले. मात्र युवकाकडून गुप्तधन मिळू शकले नाही. त्यामुळे आपण फसल्याचे महिलेच्या लक्षात आले महिलेने ही बाब आपल्या कुटुंबियांना सांगितली त्यानंतर या युवकाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्यात आली .आठ दिवसात या युवकाकडून पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे या युवकाकडून आणखी काही जणांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे.









