रस्त्याच्या वादातून 8 वेळा चाकाखाली तुडवले, लोक वाचवण्याऐवजी व्हिडिओग्राफीत तल्लीन
वृत्तसंस्था/ भरतपूर
राजस्थानमधील भरतपूर जिह्यातील बयाना गावात रस्त्याच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा ट्रॅक्टरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. आरोपीने ट्रॅक्टरचे चाक तरुणाच्या अंगावर आठवेळा चालवले. यावेळी उपस्थित लोक या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.
भरतपूरमध्ये बयाना येथील सदर पोलीस स्टेशन हद्दीतील अ•ा गावात दोन पक्षकारांमधील जमिनीचा वाद पुन्हा एकदा हत्येचे कारण बनला आहे. एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या तऊणाची ट्रॅक्टरने चिरडून निर्घृण हत्या केली. आरोपी ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ट्रॅक्टरची चाके जमिनीवर पडलेल्या तऊणावर आठ वेळा मागे-पुढे फिरवली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण पसरले. माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत युवक निरपत अतारसिंग गुर्जर याचा मृतदेह ऊग्णवाहिकेद्वारे बयाना सीएचसीमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अड्डा गावातील बहादूर गुर्जर आणि अतारसिंग गुर्जर या दोन बाजूंमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू होता. या वादावरून बुधवारी सकाळी आठच्या सुमारास दोन्ही बाजूचे लोक पुन्हा आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लाठ्या आणि दगडांनी हल्ला केला. यामध्ये दोन्ही बाजूच्या महिलांचाही समावेश होता.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. मारामारीदरम्यान निरपत नावाचा तऊण जमिनीवर पडला. त्याचदरम्यान दुसऱ्या बाजूच्या तऊणाने जमिनीवर पडलेल्या निरपतवर ट्रॅक्टर चालवला. ट्रॅक्टर चालकाने न थांबता ट्रॅक्टरची चाके निरपतच्या अंगावरून आठवेळा फिरवल्यामुळे निरपतचा जागीच मृत्यू झाला.
पाच दिवसांपूर्वीही हाणामारी
पाच दिवसांपूर्वी 21 ऑक्टोबर रोजी याच वादातून बहादूर आणि अतारसिंग गुर्जर पक्षांमध्ये मारामारी झाली होती, त्यात बहादूर आणि त्याचा लहान भाऊ जनक गंभीर जखमी झाले होते. या घटनेबाबत बहादूर यांचा मुलगा दिनेश याने दुसऱ्या पक्षाचे अतरसिंग व त्यांचे मुलगे निरपत, विनोद, दामोदर व नातेवाईक ब्रजराज यांच्याविऊद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपी ट्रॅक्टर चालकाची ओळख पटवली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बयाना सीएचसी येथे पाठविण्यात आल्याचे सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ जयप्रकाश परमार यांनी सांगितले.









