भावाच्या डोळ्यासमोर घडली हृदयद्रावक घटना
सांगोला : माण नदीपात्रात तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वा. च्या सुमारास गावडे वरती, सावे (ता. सांगोला) येथे पडली. बंडू आत्माराम गावडे (वय ३५, रा. गावडे वस्ती, सावे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मृत बंडू गावडे याने मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास त्याचा भाऊ अंकुश गावडे यास फोन करुन मी सांगोला येथे आहे. मला घरी नेण्यासाठी या असे सांगितले. भाऊ अंकुश मोटारसायकलवरून बंडू गावडे यास सांगोला येथे शोधताना बंडू डा सांगोला एसटी स्टैंड येथे दारुच्या नरोत मिळून आला.
अंकुशने बंडू यास मोटारसायकलवरुन कोपटेवस्ती मार्गे सावे येथील घराकडे निघाला असता माण नदीवरील कोपटेवरती जवळील पुलावर बंडू याने मला लघुशंका करायची आहे म्हणून अंकुशने मोटारसायकल बांबवली बंहुने अचानक पुलाच्या कठघावरुन माण नदीतील पाण्याच्या पात्रात उही घेतली अंकुशने आरडाओरडा केला असता श्रीकांत कोळवले यांना बोलावून बंडू गावडे यास पाण्यातून बाहेर काढले.
रुग्णवाहिकेतून सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मरण पावल्याचे सांगितले याबाबत अंकुश गावडे यांनी पोलिसात खबर दिली आहे.








