आत्महत्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर : रत्नागिरीत मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये आढळला होता युवकाचा मृतदेह : पट्टा पोलिसांनी केला जप्त
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या ज़े. के. फाईल्स साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. साहिले मोरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. साहिल याने किचनमध्ये कुत्रा बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीसारख्या पट्ट्याचा वापर करून गळफास घेतल़ा. हा पट्टा शहर पोलिसांकडून जप्त करण्यात आला आह़े. प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचे समोर येत असले तरी पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत़.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल विनायक मोरे (22, ऱा अलावा रत्नागिरी) हा शहरातील एका शोरूममध्ये कामाला होत़ा. शुक्रवारी सकाळी साहिल कामाला जातो, असे सांगून तो घरातून बाहेर पडल़ा. दरम्यान साहिल हा कामावर जाण्याअगोदर साईभूमीनगर येथील मैत्रिणीच्या फ्लॅटवर गेल़ा. यावेळी साहिल याची मैत्रिणी फ्लॅटवरच होत़ी. यानंतर मैत्रिणीलाही कामावर जायचे असल्याने तू बिल्डींगखाली थांब. मी थोड्यावेळातच येतो, असे साहिल याने मैत्रिणीला सांगितल़े.
हे ही वाचा : भरदिवसा चोरट्यांनी घर फोडले; रत्नागिरीनजीकच्या कारवांचीवाडीतील घटना
कॉलला उत्तर दिले नाही
साहिल याची मैत्रिण बिल्डींगखाली त्याची वाट पाहत उभी होत़ी. बराच वेळ झाला तरी साहिल येत नसल्याने मैत्रिणीने मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल़ा. अनेकवेळा कॉल करण्याचा प्रयत्न केल़ा मात्र साहिलने या कॉलला उत्तर दिले नाह़ी. अखेर साहिल याचा शोध घेण्यासाठी मैत्रिण पुन्हा फ्लॅटवर गेल़ी यावेळी साहिल हा किचनमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल़ा.
सुरीने गळफास घेतलेला पट्टा कापला
साहिल याने गळफास घेतलेला पाहून मैत्रिणीच्या पायाखालची वाळूच सरकल़ी. यावेळी तिने किचनमधील सुरीच्या सहाय्याने साहिल याच्या गळ्यातील पट्टा कापल़ा. गळ्यातील पट्टा कापल्याने साहिल याचा मृतदेह किचनच्या लादीवर पडल़ा. यानंतर या मैत्रिणीने साहिलच्या बहिणीला फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिल़ी. बहीण या फ्लॅटवर पोहचताच दोघींनी साहिल याला खासगी रूग्णालयात दाखल केल़े. या ठिकाणी साहिल याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल़ा. जिल्हा रूग्णालयात साहिलला दाखल करताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केल़े.
पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी
साहिल याने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपास समोर आले आह़े साहिलचा शवविच्छेदन अहवालही त्याकडेच इशारा करत आह़े असे असले तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी करण्यात येत आह़े त्यासाठी पोलीस साहिल याच्या मैत्रिणी, घटना घडलेला फ्लॅट मालक, शेजारी यांच्याकडे चौकशी करत आहेत़ तसेच साहिल याच्या कुटुंबियांकडून घातपात झाल्याबाबत संशय व्यक्त केला असल्याने त्या दृष्टीनही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.