रत्नागिरी :
शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसी रेल्वे कॉलनीजवळील रेल्वे रुळावर तरुणाने मालवाहू रेल्वेखाली आत्महत्या केल़ी ही घटना शनिवारी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडल़ी बसुराज शरणप्पा कुडगी (38, ऱा एमआयडीसी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
कोकण रेल्वे मार्गावरील मालवाहू ट्रेन व्हीईएन बीसीएन ही 15 मार्च रोजी निवसर ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन अशी येत होत़ी सायंकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास ही गाडी एमआयडीसी रेल्वे कॉलनी येथील रेल्वे रुळावऊन जात असताना बसुराज याने ट्रेनखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आह़े या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आह़े.








