वयाच्या 15 व्या वर्षी केली कमाल
उत्तरप्रदेशातील एका मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी स्वत:चे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नेंदविले आहे. या मुलाचे नाव सिदकदीप सिंह चहल असून मेल टीनेजरच्या श्रेणीत सर्वात लांब केस असण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केला आहे. त्याने कधीच स्वत:चे केस कापले नाहीत, यामुळे त्याच्या केसांची लांबी 4 फूट आणि 9.5 इंच इतकी आहे. तो स्वत:च्या केसांना आठवड्यात दोनवेळा धुत असतो, जर आईने मदत न केल्यास यात पूर्ण दिवसही लागतो असे त्याचे सांगणे आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार चहल शीख कुटुंबाचा सदस्य आहे. त्याचे अनेक मित्र देखील शिखधर्मीय आहेत, परंतु कुणाच्या केसांची लांबी त्याच्या केसांइतकी नाही. केस अखेर इतके लांब कसे झाले याबद्दल त्याचे कुटुंबीयही आश्चर्य व्यक्त करतात. चहलने स्वत:च्या नातेवाईकान सर्वप्रथम याबद्दल सांगितले तेव्हा ते यावर विश्वास ठेवत नव्हते. याचमुळे चहलला याचे पुरावे दाखवावे लागले. परंतु चहलसाठी हे सर्व काही सोपे नव्हते. लहानपणी अनेक मित्र त्याची चेष्टा करायचे.









