स्वत:वर खर्च केले 1 कोटी रुपये, लोकांनी केली थट्टा
जगात प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याची तीव्र इच्छा असते, परंतु महिलांमध्ये ही इच्छा कधीकधी अधिक असू शकते. ब्रिटनच्या एका महिलेत ही इच्छा इतकी अधिक होती की, तिने 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करत स्वत:ला एखाद्या बाहुलीप्रमाणे लुक दिला. परंतु तिला लवकरच स्वत:च्या चुकीची जाणीव झाली आणि आता ती सामान्य म्हणजेच पूर्वीसारख्या ऊपात परतली आणि स्वत:ला ती सुंदर मानते.
36 वर्षीय ट्रेसी किस ही बकिंघमशायर येथे राहते आणि ती सध्या चर्चेत आहे. परंतु यावेळी ती सौंदर्य त्यागण्यासाठी चर्चेत आली आहे. किशोरावस्थेपासूनच ब्युटी ट्रीटमेंट्स आणि कॉस्मेटिक सर्जरीची शौकीन राहिलेल्या ट्रेसीने सुमारे 1.05 कोटी रुपये खर्च करत स्वत:च्या बहुतांश प्रक्रिया रिव्हर्स करविल्या आहेत. आता तिने जीवनभरासाठी बोटॉक्स आणि फिलर्सना निरोप दिला आहे.
बार्बीसारखी दिसण्याची किंमत
ट्रेसीची ब्युटी जर्नी एखाद्या फेयरी टेलसारखी नव्हती. मागील दोन दशकांमध्ये तिने 5 शस्त्रक्रिया, चिन लिपोसक्शन, आयलिड लिफ्ट, नोज जॉब, ब्राझिलियन लिफ्ट, लेबियाप्लास्टी आणि दातांचे स्ट्रेटनिंग करविले. तसेच बोटॉक्स आणि फिलर्ससोबत सेमी-परमनंट मेकअप आणि आयलॅश एक्सटेंशन्सद्वारे ती स्वत:चा ‘परफेक्ट लुक’ कायम राखू इच्छित होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. परंतु सामान्य जीवनात तिच्याकडे इतर लोकांकडून संशयाच्या नजरेने पाहिले जाते.
टीकेने बदलली मानसिकता
लोकांनी मला नकली, अहंकारी आणि निरक्षरही समजले. मी आत्मघृणेने ग्रस्त असून सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेत असल्याचे काहींचे मानणे होते. तर प्रत्यक्षात मी आत्मविश्वासाने भरपूर राहिली आहे. हे सर्व केवळ किशोरावस्थेत स्वत:ला सुंदर दाखविण्याचा निरागस प्रयत्न होता. परंतु हळूहळू मी स्वत:ला एका बार्बी डॉलमध्ये बदलून बसले. ज्या चेहऱ्याला आरशात पाहत आहे तो माझा नसल्याचे जाणीव एकेदिवशी झाली. माझ्या सौंदर्याची निवड माझ्या व्यक्तिमत्त्वापासून दूर नेत होती. ते हटविणे स्वत:कडे परतण्यासारखे असल्याचे तिने सांगितले आहे.
बदलाची सुरुवात
ऑगस्ट 2023 मध्ये ट्रेसीने पहिले पाऊल उचलले. तुर्कियेत जात तिने एक शस्त्रक्रिया करविली. यानंतर तिने स्वत:च्या चेहऱ्याचे फिलर्स हटविले, ज्यात चिन, जबडा, नाक आणि ओठाचे इंजेक्शन सामील होते. तिने बोटॉक्स आणि केस, नखांच्या फॉलोअप अपॉइंटमेंट्स देखील कायमस्वरुपी बंद केल्या.
दर आठवड्याला केवळ लॅशेज अन् नेल्सवर 60 युरो खर्च करणे अत्यंत सोपे आहे. परंतु जेव्हा तुम्ही यात केस, टॅनिंग, बोटॉक्स आणि फिलर्स जोडतात, तेव्हा हा खर्च शेकडो पाउंडमध्ये बदलतो, असे ती सांगते. ट्रेसी आता मेकअपशिवाय अधिक आत्मविश्वासी वाटते आणि लोक मला आता युवांप्रमाणे पाहतात. आता मी कुठल्याही चिंतेशिवाय सकाळी उठून आयुष्य जगू शकते. मी केवळ आता स्वत:साठी जगते, इतरांना इंप्रेस करण्याचा विचार मी सोडून दिला अहे. मला सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य प्रसाधनांची गरज नसल्याचे ट्रेसीने म्हटले आहे.









