कुंभकर्णाविषयी बालपणी ऐकले असेल, जो वर्षातील 6 महिन्यांपर्यंत झोपलेलाच असायचा. परंतु अमेरिकेत एका महिलेची झोप देखील कुंभकर्णासारखीच आहे. याच झोपेच्या नादात ती स्वत:चा वाढदिवस विसरली आणि सलग दोन आठवड्यांपर्यंत झोपून राहिली. कुटुंबीय आले आणि पार्टी करून गेले, परंतु ती स्वत:च्या वाढदिवसाच्या पार्टीत सामील होऊ शकले नाही. प्रत्यक्षात या महिलेला स्लीपिंग ब्यूटी सिंड्रोमची समस्या आहे. यामुळे तिला सातत्याने झोपावे लागते.
24 वर्षीय बेला एंड्य्रू एक नर्स आहे, परंतु या दुर्लभ आजारामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही वर्षांपूर्वी मला अटेंशन सीकिंगची समस्या असल्याचे डॉक्टर सांगायचे. परंतु मागील महिन्यातच मला क्लीन लेविन सिंड्रोम नावाची समस्या असल्याचेही कळले, यामुळे मी सातत्याने झोपून असते. कधी कधी तर 2 आठवड्यांपर्यंत मी जागीच होत नाही. या आजारामुळे माझे आयुष्य भीतीदायक झाले असून मी स्वत:ला भूत प्रेत समजत असल्याचे बेलाने सांगितले आहे.
बेला स्वत:चा जोडीदार मेग स्टोनसोबत डेवोन येथे राहते. पहिल्यांदा 2016 मध्ये तिला स्वत:च्या समस्येची जाणीव झाली. एका पार्टीत डिंक्स घेतल्यावर घरी परतल्यावर ती झोपी गेली होती. यानंतर तब्बल 10 दिवसांपर्यंत ती झोपूनच होती. यानंतर तिच्यासोबत दर महिन्यातून एकदा 10-12 दिवसांपर्यंत झोपून राहण्याचा प्रकार घडत आहे. बेला जेव्हा झोपेत असते तेव्हा ती अत्यंत भयानक झोपेत जाते. तिच्या शेजारी स्फोट झाला तरीही तिला कळत नसल्याचे मेगने सांगितले आहे.
ब्रिटनमध्ये एका युवतीला आजार
काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये देखील असेच प्रकरण समोर आले होते. 21 वर्षीय रोडा रॉड्रिग्ज डियाज नावाच्या युवतीला हा आजार आहे. ती सलग तीन आठवड्यांपर्यंत झोपून राहते. या झोपेमुळे तिची पदवी परीक्षाही हुकली आहे. एकदा झोपी गेल्यावर ती किमान 21 तास झोपून राहते. या आजारावर कुठलाच उपचार नाही. हा एक न्यूरोलॉजिकल आजार असून वयासोबत स्लीपिंग ब्यूटी सिंड्रोमचा प्रभाव कमी होत जातो असे डॉक्टरांचे सांगणे आहे.









