तुम्हाला तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यात काय-काय आठवते? तुम्हाला सर्वकाही आठवते का? याचे उत्तर नाही असेल. परंतु सर्वकाही आठवणीत राहणारी व्यक्ती सुपर पॉवर असलेली असू शकते. परंतु सामान्य माणसासोबत देखील असे घडू शकते. जगात एक अशी महिला आहे, जिला स्वत:च्या जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट आठवते. ऑस्ट्रेलियातील एका महिलेसोबत हा अशक्य वाटणारा प्रकार घडत आहे. स्वत:च्या जीवनातील प्रत्येक क्षण आठवतो. तसेच स्वत:च्या जन्मापूर्वीच्या अनेक गोष्टी आठवतात असा दावा ही महिला करते आणि स्वत: डॉक्टरांनी हा दावा खरा असल्याचे म्हटले आहे.
एक खास प्रकारचा विकार
ऑस्ट्रेलियातील रेबेका शारॉक हायपरथामीसिया नावाच्या विकाराने ग्रस्त आहे. वैज्ञानिक याला हायपरथाइमेस्टिक सिंड्रोम हायली सुपीरियर ऑटोबायोग्राफिकल मेमोरी म्हणतात. याला वैद्यकीय जगतात एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हटले जाते. यामुळे लोक स्वत:च्या जीवनातील घटना विसरू शकत नाहीत आणि त्यांना जीवनातील प्रत्येक सुक्ष्म तपशील देखील आठवत असतो.
जगात असे किती लोक?
रेबेका अशाप्रकारची जगातील एकमेव व्यक्ती नाही. जगात अशाप्रकारचा विकार 60 लोकांना असून यात रेबेकाचा समावेश आहे. हेलोक जगातील लोकसंख्येच्या 0.00001 हिस्स्याचे आहेत. अशा लोकांना स्वत:च्या जन्मापूर्वीच्या गोष्टीही आठवडत असतात. परंतु रेबेकाला स्वत:चे हे रहस्य वयाच्या 21 वर्षापर्यंत कळले नव्हते. रेबेका विस्मृतिच्या सुखाचा आनंद का घेऊ इच्छिते असा प्रश्न लोकांना पडतो. तिच्यासाठी झोप न लागणे एक समस्या आहे तसेच चिंता आणि तणावासाठी तिला थेरपीची गरज भासते. परंतु स्वत:च्या या स्थितीचा लाभ घेत तिने काही भाषा शिकल्या आहेत.









