युक्रेनमधील महिला सोशल मीडियावर चर्चेत
जगातील अनेक लोकांना अजब ध्यास लागलेला असतो. अनेक लोकांमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्त्व बदलण्याचा ध्यास असतो. अशाच प्रकारे युक्रेनमधील एका महिलेसोबत घडले असून ती सध्या चर्चेत आली आहे. ही महिला एखाद्या बार्बी डॉलसारखे दिसते. या महिलेने बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी स्वतःचा लुक पूर्णपणे बदलला आहे.
युक्रेनमधील मॉडेल आणि इन्फ्लुएंसर वॅलेरिया लुक्यानोव्हाला लोक खऱया जीवनातील बाबी डॉल संबोधित असतात. याचे कारण तिचा बार्बीसारखा लूक. आपला हा लूक पूर्णपणे नैसर्गिक असल्याचा आणि याकरता आपण कुठलीच शस्त्रक्रिया करविली नसल्याचा तिचा दावा आहे. परंतु तिचा दावा खरा वाटत नाही. तर काही जणांनुसार तिने स्वतःवर एक शस्त्रक्रिया करविली आहे.

कुटुंबीयांसोबत भांडून तिने वयाच्या 13 व्या वर्षी केस रंगविण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या 16 व्या वर्षी ती मॉडेलिंग करू लागली होती. मेकअप करण्यास मला दीड तासांचा कालावधी लागतो, त्यानंतरच माझा लुक बार्बीसारखा दिसू लागतो, परंतु यासाठी मी कुठलीच शस्त्रक्रिया करिवली नसल्याचे 37 वर्षीय वॅलेरियाचे म्हणणे आहे.









