आंबोली वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ चिखलव्हाळ ,बेरडकी येथे गुरे चारण्यास गेलेल्या द्रौपदी मारुती नाईक, (वय 35) या महिलेवर गडगडाटासह आलेल्या परतीच्या पावसात वीज कोसळून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. चार दिवसांपूर्वी येथूनच काही अंतरावर आड्याष्टा येथे पाण्यात वीज पडून एक दुभती म्हैस व एक रेडा जागीच जळून ठार झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी अचानक विजेच्या गडगडाटासह या परिसरात पाऊस कोसळत असताना या महिलेवर वीज पडून तिचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान सदर महिला मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असे. याबाबतची माहिती चौकुळ माजी सरपंच बाबू शेटवे यांनी चौकुळ तलाठी यांना दिली आहे. द्रौपदी यांच्या पश्चात पती आणि दोन मुले आहेत. घडलेल्या घटनेने चौकुळ गावावर शोककळा पसरली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









