एआयची कमाल, पॅरालिसिसने ग्रस्त आहे महिला
पॅरालिसिसने ग्रस्त लोकांना चालण्यास सक्षम करण्यापासून जेनेटिक प्रोफाइलचे विश्लेषण करण्यापर्यंत एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. काही महिन्यांपूर्वी नेदरलँडच्या एक 40 वर्षीय इसम एआयच्या मदतीने 40 वर्षांनी चालण्यास सक्षम ठरला होता. आता वैज्ञानिकांना अशाप्रकारचे अन्य यश देखील दिसू लागले आहे. एक महिला सुमारे 18 वर्षांनी बोलू शकली आहे.
ऐन जॉन्सन यांना वयाच्या 30 व्या वर्षी ब्रेनस्टेम स्ट्रोक झाला होता, यामुळे त्यांना पॅरालिसिस झाले होते. मागील 18 वर्षांपासून त्या तोंडातून एक शब्दही उच्चारू शकल्या नव्हत्या. परंतु आता एआयच्या मदतीने त्यांचे जीवन बदलून गेले आहे. त्यांच्या मेंदूत 250 हून अधिक इलेक्ट्रोड्स इम्लांट करण्यात आले आहेत. या इलेक्ट्रोड्सनी स्पीच प्रोसेसिंगशी निगडित मेंदूच्या हिस्स्याला व्यापले आहे. त्यांनी मेंदूच्या संकेतांना इंटरसेप्ट करत ते कॉम्प्युटरवर पाठविले आहेत. या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ऐनचा डिजिटल अवतार दिसून येत होता. कुठला अवतार असावा याचा निर्णय देखील ऐन यांनीच घेतला आहे.

या घटनेचा व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आला आहे. ऐन जो विचार करत आहे, तो कॉम्प्युटर स्क्रीनवरील अवतार कशाप्रकारे उच्चारत आह हे या व्हिडिओत दिसून येते. हा आवाज काही वर्षांपूर्वी रिकॉर्ड करण्यात आलेल्या ऐनच्या आवाजाच्या एका कॉपीचा वापर करून तयार करण्यात आला आहे. ऐन यांनी स्वत:च्या विवाहाच्या दिनी 15 मिनिटांचे भाषण केले होते. स्क्रीनवर दिसणारा डिजिटल अवतार अधिक सजीव करण्यासाठी विविध प्रकारच्या हावभावांचा वापर करण्यात आला आहे.
ऐनने स्वत:च्या मेंदूच्या सिग्नल्सना ओळखण्यासाठी सिस्टीमच्या एआय अल्गोरिदमला प्रशिक्षित करण्यासाठी टीमसोबत काम केले. या प्रशिक्षण सत्रांमध्ये 1024 शब्दांसोबत विविध वाक्यांचा पुनरुच्चार सामील होता. हे शब्द तोपर्यंत वारंवार उच्चारण्यात आले, जोपर्यत कॉम्प्युटरने स्पीचच्या सर्व बेसिक साउंट्सशी निगडित मेंदू अॅक्टिव्हिटी पॅटर्न्स ओळखल्या नाहीत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील न्यूरोलॉजिकल सर्जरीचे प्रमुख डॉक्टर एडवर्ड चांग यांनी लोक कोण असतात हे जाणून घेण्याचा प्रयोग करत होतो असे म्हटले आहे. ब्रेनस्टेम स्ट्रोकने पीडित झाल्यावर ऐन यांनी स्नायूंवरील नियंत्रण गमाविले होते. ऐन यांनी अनेक वर्षांपर्यंत फिजिकल थेरपी घ्यावी लागली होती. यामुळे त्या चेहऱ्यावरील स्नायूंची हालचाल करू शकत होत्या.









