खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. कोनवाळ गल्ली परिसरातही पाणी आले नाही. त्यामुळे टाकीत पाणी आहे की नाही, हे पाहण्यासाठी टेरेसवर चढलेल्या महिलेचा पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोनवाळ गल्ली येथे मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली आहे. दीपा मंजुनाथ पावले (वय 42) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणी आले नव्हते. त्यामुळे दीपा या आपल्या मुलीसह वरच्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी आहे का, हे पाहण्यासाठी गेल्या. टाकी उंचावर होती. तर बाजूला प्लास्टिक पत्रा घालण्यात आला होता. सिंटॅक्स टाकीमध्ये पाणी पाहून त्या खाली उतरत होता. त्यावेळी त्यांनी प्लास्टिक पत्र्यावर पाय ठेवला. त्यावेळी तो पत्रा फुटून त्या थेट खाली कोसळल्या. यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे त्यांच्या मुलीने आरडाओरडा केला. गंभीर जखमी झालेल्या दीपा यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे पावले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दीपा यांचे पती उद्यमबाग येथे कामाला गेले होते. तर एक मुलगी आजारी होती. याचवेळी ही घटना घडल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात सासू, पती, दोन मुली आहेत. गुऊवारी सकाळी 8 वाजता रक्षाा†वसर्जन होणार आहे.









