बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ चेन स्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. रविवारी सायंकाळी सर्वजण विश्वचषक क्रिकेट सामना बघण्यात मग्न असताना जैन बस्तीहून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील चार तोळ्यांचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पळविले आहे. महावीरनगर, मजगाव येथे रविवार दि. 19 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच उद्यमबागचे पोलीस निरीक्षक डी. के. पाटील व त्यांचे सहकारी मजगाव येथे दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. महावीरनगर येथील अनिता बाहुबली चौगुले (वय 40) या रविवारी सायंकाळी जैन बस्तीतील धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी जात होत्या. घराच्या पायरीजवळ असतानाच मोटारसायकलवरून दोघे भामटे त्यांच्याजवळ आले. पाठीमागे बसलेल्या भामट्याने मोटारसायकलवरून खाली उतरून अनिता यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले. अनिता यांनी आरडाओरड करू नये म्हणून भामट्याने त्यांचा गळा दाबल्याचे सांगण्यात आले. विश्वचषक क्रिकेट सामन्यामुळे या परिसरात वर्दळ कमी होती. याच संधीचा फायदा घेत भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे गंठण पळविले असून महिलेने आरडाओरड करताच दोन्ही भामटे तेथून पसार झाले. अनिता व त्यांचे कुटुंबीय रात्री एफआयआर दाखल करण्यासाठी उद्यमबाग पोलीस स्थानकात तळ ठोकून होते. उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
Previous Articleपाळणाघरांसाठी ग्रा.पं.ना करावी लागणार आर्थिक तरतूद
Next Article बोलेरोची धडक बसून सोनट्टीची महिला ठार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.