वाकरे।प्रतिनिधी
कोल्हापूर-गगनबावडा राज्य रस्त्यावर दोनवडे फाट्यानजीक देवगडहून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने समोरून येणाऱ्या स्कुटरस्वाराला विरुद्ध दिशेने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाले. सौ. अरुंधती बाळासाहेब पाटील (वय ४८, रा.कुडीत्रे, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव असून बाळासाहेब आकाराम पाटील (वय ५३) असे जखमी पतीचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळ आणि करवीर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी बाळासाहेब पाटील हे आपल्या पत्नी अरुंधती पाटील यांना घेऊन एक्टिवा स्कूटरवरून कोल्हापुरात कामानिमित्त व बाजारासाठी गेले होते. कोल्हापुरातील काम संपल्यानंतर दुपारी एकच्या सुमारास ते आपल्या कुडित्रे या गावी जात होते.यावेळी कोल्हापूर – गगनबावडा राज्यरस्त्यावर दोनवडे फाट्याच्या पश्चिमेकडे देवगडवरून कोल्हापूरकडे भरघाव वेगाने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने कोल्हापूरकडून कुडित्रेकडे जाणाऱ्या पाटील दांपत्यास समोरून विरुद्ध दिशेने उजवीकडे जोरदार धडक दिली आणि या दाम्पत्यास अक्षरशः फरफटत पुढे नेले.सौ.पाटील या उजवीकडील पुढील चौकात अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांचे पती बाळासाहेब पाटील हे गंभीर जखमी झाले.त्यांच्या पायाला आणि हाताला फ्रॅक्चर झाले.तातडीने त्यांच्यावर तेथीलीच दवाखान्यात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोल्हापुरातील प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, पाटील दांपत्याचा मुलगा आणि मुलगी पुण्यात असल्याने ते आल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघातानंतर करवीरचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.या अपघाताची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस निरीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी गुरव हे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान अपघातग्रस्त एसटी बसचा चालक महेंद्र संतोष पाटील (रा .खर्दे खुर्द ता. जि. नंदुरबार) व वाहक के.पी.बारगजे (रा.बीड) हे पोलिसात हजर झाले आहेत. त्यांना पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अबुधावीवरून सुट्टीसाठी आलेल्या सौ. पाटील यांच्यावर काळाचा घाला
बाळासाहेब पाटील हे गेली काही वर्षे अबुधावी येथे अभियंता म्हणून नोकरीस असून १५ दिवसापूर्वी सुट्टीसाठी ते गावी आले होते. येत्या शनिवार दि.६ रोजी अबुधावीस जाण्यासाठी त्यांनी विमान तिकीट बुक केले होते. तत्पूर्वीच काळाने त्यांच्या पत्नीवर घाला घातला.त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध-
या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून समोरून येणाऱ्या स्कूटरवर एसटी बस विरुद्ध दिशेने जाऊन धडकल्याचे स्पष्ट दिसत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









