कसबा बीड/ प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील अश्विनी सर्जेराव रानगे (माहेरचे नाव, वय वर्ष ३०) हिचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी रानगे हिचा विवाह पट्टणकोडोली ता. हातकणंगले, येथील संतोष कुरणे यांच्याशी झाला होता,पण तिला फिट्स येण्याचा आजार असलेने सद्ध्या ती सावरवाडी येथे माहेरी आपल्या आई जवळच राहत होती. घरी शेळी मेंढी पालन व्यवसाय असल्याने गुरुवारी ( दि. १ ) दुपारी १२च्या दरम्यान बकऱ्यांना चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. काल दुपारीनंतर बराच वेळ ती घरी आली नसल्याने, घरचे लोक तिचा शोध घेत होते. शुक्रवारी जाधव यांच्या विहीरीत तिचा मृतदेह आढळला. विहीरीत पाणी पिणे किंवा हातपाय धूण्यासाठी गेली असता तिचा पाय घसरून मृत्यू झाला असल्याची गावात चर्चा होती. गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ ताशिलदार व सावरवाडीचे तंटामुक्त अध्यक्ष गजानन खोत यांनी करवीर पोलिसाना वर्दी दिली. घटनास्थळी पोलिस हवालदार सुभाष कांबळे व प्रकाश कांबळे हे पोहोचले व प्रेत बाहेर काढून रितसर पंचनामा करून कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष कांबळे हे करत आहेत. फोटो -मयत अश्विनी सर्जेराव रानगे