सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला विमानात स्वत:सोबत मोर घेऊन पोहोचल्याचे दिसून येते. ही घटना एका सहप्रवाशाने मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली. तिने हा मोर स्वत:च्या मांडीवर घेत विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील मोराच्या सौंदर्याचे अनेक लोकांनी कौतुक केले आहे.

ही घटना मागील वर्षात घडल्याचे सांगण्यात येत असले तरीही हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत मोर एकदम शांत दिसून येत आहे, परंतु या व्हिडिओबद्दल लोक सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक मोराच्या सुरक्षेवरून भीती व्यक्त करत आहेत. तर अनेक लोकांनी या घटनेला एअरलाइन्सचा निष्काळजीपणा ठरविले आहे. मोराला विमानात शिरू देण्याची घटना सुरक्षा नियमांच्या विरोधात असल्याचे त्यांचे सांगणे आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर 8 हजार लाइक्स प्राप्त झाल्या आहेत.









