वृत्तसंस्था/ चेन्नई
चार वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स आज रविवारी येथे होणार असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सशी भिडणार असून त्यावेळी विजय मिळवून ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने एक ठोस पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. 12 सामन्यांतून 15 गुणांसह चेन्नई सुपर किंग्स पुढील टप्प्यात जाण्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या स्थितीत आहेत. दुसरीकडे, ‘केकेआर’चे फक्त 10 गुण झालेले असून त्यांना त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील आणि इतर निकाल त्यांना अनुकूल असे लागतील अशी आशा बाळगून राहावे लागेल.

महेंद्रसिंह धोनीच्या संघाने मागील दोन सामन्यांत विजय मिळविलेले असून नेहमीप्रमाणे त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यावर मात करणे कठीण जाईल. धोनीच्या बॅटमधून निघालेले काही षटकारही चेपॉकवरील प्रेक्षकांना उत्साहित करण्यास पुरेसे ठरतील आणि त्याने दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या मागील सामन्यात हे करून दाखविलेले आहे. ‘सीएसके’चे डेव्हन कॉनवे (420 धावा) आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीचे फलंदाज दमदार सुऊवात करत आले आहेत. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांना त्यांची भूमिका स्पष्टपणे माहीत असल्याने फायदा होत आहे आणि ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. येथील संथ खेळपट्टीवर इतर फलंदाज धडपडत असताना दुबेने काही मोठे फटके हाणलेले आहेत.
मोईन अली, रवींद्र जडेजा आणि अंबाती रायुडू यांचा अपेक्षित प्रभाव पडलेला नसला, तरी चेन्नई सुपर किंग्सने चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजीत विशेषत: मथिशा पथिरानाने कर्णधाराला हवे तसे काम केले आहे. तुषार देशपांडे महाग ठरलेला असला, तरी बळी घेण्यात यशस्वी झालेला आहे. जडेजा, मोईन आणि महेश थेक्षाना हे फिरकीपटू विरोधी फलंदाजांना रोखण्याच्या बाबतीत प्रभावी ठरले आहेत. दिल्लीच्या संघाला बुधवारी त्याचा प्रत्यय आलेला आहे.
‘केकेआर’च्या फिरकीपटूंच्या बाबतीत वरुण चक्रवर्ती आणि लेगस्पिनर सुयश शर्मा कशी गोलंदाजी करतात त्यावर सामन्याचा निकाल बराच अवलंबून राहील. अनुभवी सुनील नरेन अजूनपर्यंत फॉर्मात दिसलेला नसून त्याला सुधारणा करावी लागेल. फलंदाजीत कर्णधार नितीश राणा आणि व्यंकटेश अय्यर यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ‘केकेआर’ला सलामीवीरांकडून चांगल्या सुऊवातीची अपेक्षा असेल, जेणेकरून बाकीच्यांना त्यावर डाव उभारता येईल. तथापि, पथिरानाचे यॉर्कर्स आणि संथ चेंडू बरीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. जडेजाच्या बाबतीतही विरोधी फलंदाज सावध असतील, कारण तो अचूक गोलंदाजी करतो. कोलकाता नाईट रायडर्सला गुऊवारी राजस्थान रॉयल्सच्या हातून दणदणीत पराभव स्वीकारवा लागलेला असला, तरी त्यातून बाहेर सरून त्यांना सकारात्मक मानसिकतेने आज मैदानात उतरावे लागेल. आज पराभूत झाल्यास त्यांच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या संधीला जबर धक्का बसू शकतो.
संघ : चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), आकाश सिंग, मोईन अली, भगत वर्मा, दीपक चहर, डेव्हन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, सिसांदा मगला, अजय मंडल, मथिशा पथिराना, ड्वेन प्रिटोरियस, अजिंक्य रहाणे, शेख रशिद, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांशू सेनापती, सिमरजित सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, बेन स्टोक्स, महेश थेक्षाना.
कोलकाता नाईट रायडर्स : नितीश राणा (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वऊण चक्रवर्ती, अनुकूल रॉय, रिंकू सिंग, एन. जगदीशन, वैभव अरोरा, सुयश शर्मा, डेव्हिड विसे, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, आर्या देसाई आणि जॉन्सन चार्ल्स.









