आजरा तालुक्यातील घटना
आजरा : तालुक्यामध्ये वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हत्तीसह गव्यांचा गावांमधील प्रवेश नित्याचा झाला आहे. दरम्यान, भावेवाडीत शिरलेल्या गव्याने ग्रामस्थांना चांगलेच हैराण करून सोडले. सैरभैर झालेल्या या गव्याच्या हल्ल्यातून सुदैवाने एक महिला बचावली.
गुरुवारी दुपारच्या दरम्यान एक गवा भावेवाडी गावामध्ये शिरला. गवा आल्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केला. हे दृश्य पाहताच ग्रामस्थदेखील त्याला हुसकावून लावण्यासाठी पुढे सरसावले. दरम्यान या सर्व प्रकारात रस्त्यावरून चाललेल्या एका महिलेला गव्याची धडक बसणार होती. सुदैवाने गावकऱ्यांचा व कुत्र्यांचा गोंधळ ऐकून महिलेने तिथून पळ काढला. यामध्ये महिला अचानक बाजूला झाल्याने गव्याच्या हल्ल्यातून बचावली.
हे ही वाचा : जिल्हा परिषदेच्या सुधारित ५० कोटीच्या अर्थसंकल्पाला मान्यता
सदर प्रकारानंतर ग्रामस्थांनी गव्याला गावातुन जंगलाच्या दिशेने हुसकावून लावले. गेले दोन दिवस भावेवाडी परिसरात सदर गव्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.