सांगली :
महापालिका आरोग्य विभागाचे वतीने अनंत चतुदर्शी दिवशी पालिका क्षेत्रात ६० टन, तर अकरा दिवसात विक्रमी १२० टन कचरा उठाव करण्यात आला असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली.
मनपामार्फत सुरू असलेल्या गणेशोत्सव मूर्ती दान उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील प्रभागांतून तब्बल ७८ मूर्तीचे दान संकलन ९ व्या दिवशी करण्यात आले आहे. आज अखेर एकूण ७०२३० मूर्ती विसर्जन झाले आहे.
- १२० टन कचरा उचलला
महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी स्वतंत्र मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी यंदा विसर्जनासाठी आलेल्या मूर्तीची नोंद करून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक प्रभागामध्ये दररोज दान आणि विसर्जन होणाऱ्या मूर्तीची नोंद केली जात आहे.
महापालिकेच्या पर्यावरण, आरोग्य विभागामार्फत मूर्ती दान मोहिमेचे निरीक्षण नियमितपणे केले जात आहे. तसेच मूर्तीचे दान झाल्यानंतर त्यांचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक विसर्जन करण्याची जबाबदारी पार पाडली जात आहे.
आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख राहुल रोकडे, उप आयुक्त स्मृती पाटील, मुख्य रवच्छता अधिकारी सचिन सांगावकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहा आयुक्त सहदेव कावडे, नागेश मद्राशी, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी अतुल आठवले, पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, महापालिकेच्या मूर्ती दान उपक्रमाला घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसह सार्वजनिक मंडळांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करताना महापालिकेच्या मूर्ती केंद्रांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- आयुक्तांकडून गणेश भक्तांचे आभार
गणेश भक्तांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी मनपास चांगले सहकार्य केले आहे. मनपा अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक भावनेतून कामकाज करून गणेश विसर्जन कामकाज पूर्ण केले आहे. सर्व मनपा क्षेत्रातील श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन झाले आहे. मिरजेमध्ये साधारणपणे ७सप्टेंबरला दुपारी २:३० पर्यंत सर्व श्री गणेश मूर्ती मिरवणूक, विसर्जन झाले. मनपाच्या वतीने गणेश भक्त व मंडळांचे आभारी आहे.








