घर अन् लोकांवर करतोय हल्ले
ब्रिटनच्या एका गावात लोक एका पक्ष्यामुळे त्रस्त आहेत. या पक्ष्याने एकदा शाळेतून मुलांना बाहेर पडण्यापासून रोखले आहे. तसेच अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा तोडण्याचा प्रयत्न तो करत असतो. हा डाइव्ह बॉम्बिंग बुजार्ड खास प्रकारच्या बुजार्ड म्हणजेच गिधाडाची प्रजाती आहे. बुजार्ड युरोपमधील मोठे शिकारी पक्षी आहेत. हा बुजार्ड धोक्यांना पाहून आकाशात अत्यंत वेगाने खालच्या दिशेने झेपावतो. हा पक्षी एखाद्या धोक्यावर त्याच वेगाने तुटून पडतो, ज्यामुळे तो एखाद्यावर बॉम्बप्रमाणे पडल्याचे वाटु लागते.
या पक्ष्याने ब्रिटनच्या हॅवरिंग एट बोवर गावात खळबळ उडवून दिली आहे. हा पक्षी धोका जाणवल्यास वेगाने हल्ला करतो आणि स्वत:ला ईजा होईल याची पर्वा करत नाही. अनेकदा तो आत्महत्या करतोय, असा संशय पाहणाऱ्यांना वाटतो. या गरुडाने अनेक माणसांवर हल्ले केले आहेत. 35 वर्षीय टॉमस रियान शॉबरीच्या मार्गाने जात असताना या गरुडाने त्यांचा चेहरा रक्तबंबाळ केला. तसेच या पक्ष्याने सुमारे एक किलोमीटरपर्यंत पाठलाग केला.
गावातील लोकांना या पक्ष्याला आता ब्रेंडा नाव दिले आहे. या पक्ष्याने आता प्राथमिक शाळेच्या मुलांना अनेक आठवड्यांपर्यंत घरीच थांबण्यास भाग पाडले आहे. दुसरीकडे बुजार्डला कायदेशीर संरक्षण मिळाले असून त्याला मारण्याची अनुमती देखील नाही. याचमुळे हॅवर कौन्सिल आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी फार काही करण्याच्या स्थितीत नाही.









