कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
हल्ली विवाह सोहळा हा इव्हेंट झाला आहे. एकमेकांवर चमकदारपणे उठून दिसण्याची चढाओढ समाजात निर्माण झाली आहे. यामध्ये पारंपरिकता हरवत चालली असून, भंपकगिरीचा अतिरेक होताना दिसतो आहे. पारंपरिक साधेपणा, मराठमोळ्या पद्धती आणि संस्कृती यांना बाजूला सारून प्री-वेडिंग शूट, थीम वेडिंग, इव्हेंट प्लॅनर, विदेशी खाद्यपदार्थांची रेलचेल, महागडे वेषभूषा, आणि दिखाऊ देखावे या सर्व गोष्टींमुळे सामान्य कुटुंबे कर्जात बुडताना दिसत आहेत.
पूर्वी लग्न समारंभ म्हणजे नातलग, शेजारी-पाजारी, गावकरी एकत्र येऊन साजरी केलेली आनंदाची एक पारंपरिक घटना. मराठमोळ्या पद्धतीने लग्न मंडप सजत असे. पाटावर बसवलेले नवरा-नवरी, वऱ्हाडी मंडळींसाठी श्रीखंड-पुरी, बटाट्याची भाजी, मसालेभात, वरणभात, मठ्ठा अशा स्वच्छ व सात्त्विक जेवणाचा बेत असायचा. त्यात ख्रया अर्थाने ‘आपुलकीचा गोडवा‘ जाणवायचा. खर्च मर्यादित असायचा आणि समाधान अमर्याद असायचं.
- आता ‘इव्हेंट शो‘ ची स्पर्धा…
आज मात्र विवाह सोहळा म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. सोशल मिडियावर प्रसिद्ध होण्याची हौस आणि दुस्रयाच्या लग्नाला टक्कर देण्याची स्पर्धा यामुळे भंपकगिरीने भरलेली लग्नं साजरी केली जात आहेत. लाखो रुपयांचे प्री-वेडिंग शूट, महागडे हॉटेल्स, थीम डेकोरेशन, लाईव्ह म्युझिक बँड, डीजे पार्टी, सेलिब्रिटी एंट्री या गोष्टींना प्राधान्य दिलं जातंय. यामध्ये मूळ विवाहाचा अर्थ हरवत चालला आहे. अशा भंपक आणि अनावश्यक गोष्टींवर खर्च करताना अनेक सामान्य कुटुंबे मोठ्या प्रमाणावर कर्ज काढत आहेत. बँका, फायनान्स कंपन्या किंवा खासगी सावकारांकडून घेतलेली रक्कम चुकवताना विवाहानंतर नवविवाहित दाम्पत्य व त्यांच्या कुटुंबियांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. लग्नाच्या नंतरचे दिवस समाधानाचे असण्याऐवजी कर्ज फेडण्याच्या विवंचनेत जातात.
- पारंपारिकतेपासून दूर जाण्याकडे प्रवास
सध्या लग्न म्हणजे थाटमाट आणि दिखावा झाला आहे. पारंपरिकतेपासून दूर जाऊन आपण केवळ समाजात उठून दिसण्यासाठीच खर्च करत आहोत. यामध्ये मुलांच्या भविष्यातील गरजा आणि आर्थिक स्थैर्य यांचा विचार केला जात नाही. पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांना बाजूला सारून आज बाहेरून येण्राया इटालियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, पंजाबी, राजस्थानी थाळ्यांचा सुकाळ झाला आहे. आपली अस्सल चव हरवत चालली आहे. व्रहाड्यांना ‘जेवण‘ हा अनुभव न राहता तो केवळ एक फोटोसाठीचा क्षण ठरत आहे.
मानसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते, कसबा बावडा.
- उधळपट्टी आणि नातेसंबंधातली दुरावा
या भंपकगिरीमुळे नातेसंबंधातही ताण-तणाव निर्माण होतो आहे. लग्नाच्या तयारीदरम्यानच खर्चावरून वाद निर्माण होतात. अनेक वेळा या आर्थिक भारामुळे लग्नानंतर कौटुंबिक वाद आणि घटस्फोटापर्यंत पोहोचण्याच्या घटना वाढल्या आहेत.
- भविष्यातील पिढीला संदेश
समाजातील प्रत्येक वर्गाने विवाहासारख्या पवित्र बंधनाला इव्हेंट म्हणून न पाहता एक सुंदर, अर्थपूर्ण सोहळा म्हणून साजरा करणे गरजेचे आहे. ठभंपकगिरीठ हा शब्द लग्नाच्या संदर्भात वापरण्याची वेळ आली हेच दुर्दैव. वेळेवर थांबलं नाही, तर ही दिखाऊ संस्कृती पुढील पिढीच्या पायावर कर्जरूपी ओझं ठेवून जाईल.








