बनावट पदवीची चौकशी कधी होणार अशी मोइत्रांची विचारणा : प्रश्न अदानी, पदवीचा नव्हे तर भ्रष्टाचाराचा असल्याचे दुबेंचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पैसे स्वीकारून संसदेत प्रश्न विचारल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना स्वपक्षाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या यासंबंधीच्या पत्राला उत्तर दिले आहे. मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याकरता नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयएसी) पूर्ण सहकार्य करणार असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले आहे. अश्विनी वैष्णव यांनी बनावट पदवी असणाऱ्याला पत्र लिहून माझ्या विरोधातील आरोपांच्या चौकशीत सहकार्य करणार असल्याचे कळविले आहे. मागील वर्षी दुबे हे स्वत:च्या मुलांसोबत अवैध प्रकारे विमानतळाच्या एटीएसी कक्षात शिरले होते, याप्रकरणी नागरी उ•ाण मंत्रालय कधी चौकशी करणार याची प्रतीक्षा करत असल्याचे म्हणत मोइत्रा यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी बनावट पदवी असलेल्या इसमाने एनआयसीने दुबईत लॉगइन खोलर्ण्यसह सर्व माहिती तपास यंत्रणेला पुरविली असल्याचे म्हटले होते. आता अश्विनी वैष्णव हे लोकसभा किंवा शिष्टाचार समितीने माहिती मागितल्यास देऊ असे सांगत आहेत. माझ्यावरील भाजपच्या आक्रमणाचे स्वागत आहेत, परंतु अदानी प्लस गो•ा (दुबे) बहुधा सर्वोत्कृष्ट रणनीतिकार नसावेत असे प्रत्युत्तर मोइत्रा यांनी दिले आहे.
प्रश्न संसदेची प्रतिष्ठा, भारताची सुरक्षा, कथित खासदाराचा मालकी हक्क, भ्रष्टाचार आणि गुन्ह्याचा आहे. दुबईत एनआयसी मेल खोलण्यात आला की नाही याचे उत्तर दिले जावे. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारण्यात आले की नाही? विदेश प्रवासाचा खर्च कुणी उचलला? लोकसभा अध्यक्ष किंवा विदेश मंत्रालयाची विदेश दौऱ्यासाठी अनुमती घेतली की नाही? प्रश्न अदानी, पदवी किंवा चोरीचा नाही. देशाची दिशाभूल करत मोइत्रा यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा असल्याचे खासदार दुबे यांनी त्यांना सुनावले आहे.
महुआ यांचा लोकसभा आयडी दुबईतून खोलण्यात आल्याचा आरोप दुबे यांनी 21 ऑक्टोबर रोजी केला होता. त्यावेळी तृणमूल खासदार भारतात असताना हा प्रकार घडला होता. एनआयसीवर पूर्ण भारत सरकार आहे. देशाचे पंतप्रधान, अर्थ विभाग, केंद्रीय यंत्रणांकडून एनआयसीच्या सेवेचा वापर केला जातो. एनआयसीने याप्रकरणी तपास यंत्रणेला माहिती दिली असल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.
एनआयसी केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या मंत्रालयाची धुरा अश्विनी वैष्णव यांच्याकडे आहे. दुबे यांनी मोइत्रा यांच्यावरील आरोपांप्रकरणी वैष्णव यांना पत्र लिहिले होते, ज्याच्या उत्तरादाखल मंत्र्यांनी लोकसभा सचिवालयाकडून चौकशीसाठी जी माहिती मागविण्यात येईल ती पुरविली जाईल असे सांगितले आहे.
एनआयएसीकडून ज्या संस्था सेवा प्राप्त करतात, त्यांच्या निर्देशांवरच एनआयसी काम करते. सेवा प्रदाता म्हणून एनआयएसी भारत सरकारच्या अनेक संस्थांना आयटी सेवा पुरविण्याचे काम करते. युजर अॅक्सेस आणि वेबसाइट पॉलिसीशी निगडित प्रकरणे संबंधित संस्थांच्या कक्षेत येतात. लोकसभा वेबसाइटप्रकरणी लोकसभा अध्यक्षांच्या अंतर्गत येणारे लोकसभा सेक्रेटेरिएट एनआयसीकडून सेवा प्राप्त करते.









