झऱयांसह सुंदर खोऱयाचे दिसते दृश्य
जगात काही अशी ठिकाणे आहेत जी पाहून आपण दंग होऊन जातो. सद्यकाळात ज्याप्रकारच्या इंजिनियरिंगची कल्पना केली जाते, काही ठिकाणांवर हा चमत्कार शतकांपूर्वी झाला आहे. अशाच एका ठिकाणी लोकांनी घरे बांधली असून त्यातून बाहेर डोकावल्यास क्षणभर गांगरून जायला होते.
रिपब्लिक ऑफ डॅजेस्टनमध्ये एक अत्यंत जुने गाव असून ते खोल दरीच्या तोंडावर वसलेले आहे. खोल दरीच्या वर असलेल्या या घरांमध्ये शतकांपासून लोक राहत तआहेत. या गावाचे नाव खुनजाख असून हे कित्येक शतके जुने गावे आहे. हे जगातील सर्वात अधिक चकित करणाऱया मानवी वस्तींपैकी एक आहे.

समुद्रसपाटीपासून 2000 मीटरची उंची
डॅजेस्टनचे नाव लोकांनी आतापर्यंत फारसे ऐकले नव्हते, परंतु खबीब नर्मेगोमेडोव्हमुळे हे नाव जगभरात पोहोचले आहे. रशियायच या स्वायत्त प्रजासत्ताकमध्ये मार्शल आर्ट्स मास्टर खबीबबरोबरच आणखी काही गोष्टी आकर्षित करणाऱया आहेत. यापैकी एक आहे प्राचीन गाव, जे अत्यंत विचित्र ठिकाणी वसविण्यात आले आहे. हे गाव 100 मीटर खोल दरीच्या तोंडावर आहे. डॅजेस्टनच्या राजधानीपासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावरील हे गाव समुद्रसपाटीपासून 2000 मीटरच्या उंचीवर आहे. या गावाची ड्रोनद्वारे काढण्यात आलेली छायाचित्रे पाहून चकितच व्हायला होते.
कित्येक शतके जुने गाव
हे गाव त्सोलोत्सिंस्की कॅनॉनच्या काठावर वसलेले आहे. प्राचीन काळात हे गाव कॉकसस साम्राज्याची राजधानी होते. शतकांपूर्वी ही वस्ती अत्यंत समृद्ध होती आणि 19 व्या शतकाच्या प्रारंभी हे रशियापासून वेगळे झाले होते. या ठिकाणी 70 मीटर उंचीचा धबधबा असून तो अत्यंत मोहक आहे. दरी आणि तलावाच्या आसपासचा पर्वतीय भाग आकर्षित करणारा असला तरीही येथे पोहोचणे सोपे नाही.









