स्वतःच्या कलेने जिंकतात लोकांची मने
जग हे आश्चर्यांनी भरलेले आहे, जगातील विविध देशांशी निगडित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आमच्यासमोर आल्यावर आम्ही चकित होत असतो. भारतातही अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्याबद्दल फारशी माहिती नसते. देशातील एका गावात राहणारा प्रत्येक व्यक्ती हा कमी उंचीचा आहे.
हे गाव आसाम राज्यात असून त्याला अमार गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील लोक अत्यंत उत्साहात अतिथींचे स्वागत करतात. या गावात सुमारे 70 लोकांचे वास्तव्य असून हे गाव भूतान सीमेपासून केवळ 3-4 किलोमीटर अंतरावर आहे.

कमाल 3.5 फूट उंची
या गावात कुठल्याही व्यक्तीची उंची साडेतीन फुटांपेक्षा अधिक नसल्याचे सांगण्यात येते. अमार गावात कुणी स्वतःच्या इच्छेने राहण्यासाठी आला आहे, तर कुणाला त्याच्या कुटुंबाने येथे आणून सोडले आहे.
2011 मध्ये वसविलेले गाव
2011 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे कलाकार पवित्र राभा यांनी हे गाव वसविले होते असे सांगण्यात येते. एनएसडीनंतर पवित्र हे रंगभूमीवर काम करू इच्छित होते. कमी उंचीच्या लोकांना कलाकार करण्याचा निश्चय त्यांनी केला होता. अनेक लोकांनी राभा आणि त्यांच्या सहकाऱयांची थट्टा केली, परंतु रात्रा यांनी हार मानली नाही. या गावातील लोक दिवसा शेती करतात अणि संध्याकाळी रंगमंचावर स्वतःच्या कलेद्वारे लोकांचे मनोरंजन करत असतात.









