वृत्तसंस्था/ शिंग्टन
जपानमधील याकुशिमा बेटाजवळ बुधवारी अमेरिकेचे लष्करी विमान समुद्रात कोसळले. त्याच्या इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला. विमानात 8 जण होते. मच्छिमारांनी समुद्र किनाऱ्यावरील एका व्यक्तीची सुटका केली आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली नाही. याकुशिमा बेटावर सीव्ही-22 ऑस्प्रे विमानाचे अवशेषही सापडले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.









