माणसांपेक्षा गावात पुतळेच अधिक
जगात एक असे गाव आहे, जेथे माणसांपेक्षा अधिक पुतळैच दिसून येतात. या गावात गेल्यावर प्रथमदर्शनी तुम्ही घाबरूनच जाल. या गावात सर्वत्र पुतळेच पुतळे दिसून येतात. जगातील हे अनोखे गाव जपानच्या शिकोकू बेटावर असून याचे नाव नागोरो आहे. या गावाला पुतळ्यांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. येथी स्थानिक भाषेत पुतळ्यांना बिजुका म्हटले जाते. गावात येणारे पर्यटक रात्री या पुतळ्यांना पाहून घाबरून जातात. गावात केवळ 30 लोक राहतात, तर पुतळ्यांची संख्या 300 इतकी आहे.

या गावात दुकानांवर ग्राहक, बस स्टॉपवर लोक आणि इतर ठिकाणी माणूस दिसेल किंवा नाही, परंतु पुतळे अवश्य दिसून येतील. या गावाला पुतळ्यांचे गाव हे नाव प्राप्त होण्याची कहाणी रंजक आहे. पुतळ्यांचे गाव होण्याची कहाणी केवळ 10 वर्षांपूर्वी सुरू होती. त्यावेळी एक महिलेने शाळेत ठेवण्यासाठी पुतळे तयार केले होते. एकेकाळी या गावात मोठ्या संख्येत लोक राहत होते, परंतु कामाच्या शोधात लोकांनी हळूहळू स्थलांतर केले.
अशाप्रकारे या गावात आता काही मोजकेच लोक राहत आहेत. या गावात लोकांनी एकटेपणा दूर करण्यासाठी पुतळे निर्माण करण्याची पद्धत अवलंबिली. यामुळे पूर्ण गावात ठिकठिकाणी पुतळे ठेवण्यात आले. या पुतळ्यांची निर्मिती एका वृद्ध महिलेने केली आहे. ही महिला 70 वर्षांपेक्षा अधिक वयाची आहे. गावातील एकाकीपणा दूर करण्यासाठी हे काम केल्याचे या महिलेचे सांगणे आहे. गावात कुणाला एकाकी वाटू लागल्यास तो पुतळ्यांशी बोलू लागतो असे सांगण्यात येते.









