डिजिटल इंडियाची लाट भारतात इतक्या वेगाने पसरल्यामुळे रिक्षाचालकांपासून भाजी विव्रेत्यांपर्यंत सर्वजण युपीआय वापरताना दिसतात. या माध्यमातून ग्राहकांना पेमेंट करणे खूप सोयीचे होते. तथापि, जेव्हा डिजिटल पेमेंटचा विचार केला जातो, तेव्हा बरेचदा लोक अशा युक्त्या करताना दिसतात की ते पाहणे खूपच मनोरंजक ठरते. सध्या भाजी विकणाऱ्या काकूंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये भाजी विक्रेत्या काकूंनी ऑनर्लीन पेमेंट घेण्याची अशी युक्ती काढली की सगळे बघतच राहिले.
नुकताच इन्स्टाग्रामवर भाजी विकणाऱ्या महिलेचा एक व्हिडिओ (भाजी विकणारी लेडी क्यूआर कोड जुगाड व्हिडिओ) पोस्ट करण्यात आला आहे. अकाऊंटने या व्हिडिओचे श्रेय रुपाली नावाच्या महिलेला दिले आहे. या व्हिडिओसाठी ‘स्मार्ट मावशी!’ ही टॅगलाईन वापरण्यात आली आहे. हा महाराष्ट्रातील व्हिडिओ असल्याचे समजते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला जमिनीवर बसून भाजी विकत आहे. टोमॅटो, गाजर अशा अनेक भाज्या समोर ठेवल्या आहेत. मग एक ग्राहक म्हणतो की त्याला ऑनलाईन पेमेंट करावे लागेल, म्हणून त्याने क्यूआर कोड द्यावा. त्यावेळी महिला दुसऱ्या ग्राहकासाठी भाजीपाला बांधत होती. त्याला बॅग देत असतानाच अचानक आपल्या हातातील तराजूचा कटोरा ग्राहकासमोर ठेवते. आश्चर्य वाटण्याची गरज नाही, ती कटोऱ्यात पैसे मागत नव्हती, तर पेटीएमचा क्यूआर कोड तिच्या कटोऱ्याच्या मागच्या बाजूला चिकटवण्यात आला होता. भाजी विव्रेत्यांकडे क्यूआर कोड असला तरी ही काही मोठी गोष्ट नाही, मात्र आर्श्च्याची गोष्ट म्हणजे या महिलेने क्यूआर कोड अगदी अनोख्या ठिकाणी लावल्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी तो एक धक्काच ठरत होता. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला लक्षावधी व्हूज मिळाले आहेत.









