गुल्लकमध्ये सर्वाधिक नाणी टाकण्याची कामगिरी
तुम्ही आतापर्यंत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्सबद्दल ऐकले असेल., परंतु कधी श्वानाकडून गुल्लमध्ये सर्वाधिक नाणी टाकण्याच्या विक्रमाबद्दल ऐकले आहे का? ब्रिटनमध्ये एका श्वानाने गुल्लकमध्ये नाणी जमा करण्याचा विक्रम केला आहे. कॉकर स्पॅनियल प्रजातीच्या श्वानाने एका मिनिटात तोंडाने 23 नाणी गुल्लकमध्ये जमा करण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे. या गुल्लकमध्ये नाणी जमा करण्याची कला आत्मसात करण्यात या श्वानाला 2 वर्षांचा कालावधी लागला आहे.

या कॉकर स्पॅनियल प्रजातीच्या श्वानाचे नाव लियो असून त्याने एका मिनिटात सर्वाधिक (23) नाणी गुल्लकमध्ये जमा करण्याचा विक्रम केला आहे. लियोने यापूर्वीचा 18 नाणी जमा करण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. लियो हा श्वान स्कॉटलंड येथील एबरडीनच्या रहिवासी एमिली अँडरसन यांच्यासोबत राहतो. लियो या पाळीव प्राण्याला गुल्लकमध्ये नाणी जमा करण्याची कला शिकविण्यासाठी 2 वर्षांपर्यंत प्रशिक्षण देण्यात आल्याचे अँडरसन यांनी सांगितले आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनसार 24 फेब्रुवारी रोजी युकेच्या एबरडीन, ग्रेम्पियनमध्ये एमिली यांच्या लियो या पाळीव श्वानाने एका मिनिटात सर्वाधिक 23 नाणी गुल्लकमध्ये जमा केली आहेत.
मागील 2 वर्षांमध्ये लियोला शिकविले आहे. लियो जेव्हा नाणी उचलण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा ती त्याच्या लाळेमुळे चिकटून राहायची, यामुळे नाणी उचलणे देखील अवघड ठरायचे असे एमिली यांनी सांगितले आहे. परंतु लियो यांनी विक्रम केल्यावर एमिली यांना प्रारंभी विश्वासच बसला नाही. या विक्रमामुळे त्या अत्यंत आनंदी झाल्या आहेत. लियो कधीकधी 23 पेक्षा अधिक नाणी देखील गुल्लकमध्ये जमा करतो. आतापर्यंत त्याने सर्वाधिक 26 नाणी एका मिनिटात गुल्लकमध्ये टाकली आहेत असे त्यांनी म्हटले आहे.









