वृत्तसंस्था/पल्लीकेले
येथे नुकत्याच झालेल्या लंका आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील मंगळवारी झालेला शेवटचा सामना सुपर ओव्हरपर्यंत लांबला. भारताने सुपरओव्हरमध्ये लंकेचा पराभव केला. लंकन संघाकडून टी-20 प्रकारामध्ये नवा विक्रम नोंदविला गेला. क्रिकेटच्या या प्रकारात लंकेने आतापर्यंत 105 सामने गमविण्याचा विक्रम केला आहे.
बांगलादेश संघ या क्रीडा प्रकारात सर्वाधिक सामने गमविणारा दुसरा संघ आहे. त्यांनी 104 सामने गमविले आहेत. विंडीजने 101 सामने गमावून तिसरे स्थान तर झिंबाब्वेने 99 सामने गमावून चौथे स्थान घेतले आहे.









