स्पेनच्या एलिकांटे येथील विलेनाच्या खजिन्यात आतापर्यंतच्या सर्वात रहस्यमय शोधांपैकी एक समोर आला आहे. या खजिन्यात एक कंकण अन् एक छोट्या गोल आकाराचा दागिना मिळाला आहे. हे लोखंडी नव्हे तर उल्कापिंडातून मिळालेल्या धातूने निर्मित आहे. हा शोध केवळ तांत्रिक दृष्टीकोनातून नव्हे तर सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक महत्त्वाच्या दृष्टीकोनातूनही अत्यंत आवश्यक मानला गेला आहे.
हा धातू पृथ्वीवर असलेल्या सामान्य खजिनांपेक्षा वेगळा आहे. यात निकेलचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. अंतराळातून कोसळलेल्या उल्कापिंडात हे वैशिष्ट्या आढळून येते. यामुळे हा धातू पृथ्वीवर आढळून येत नसल्याचे स्पष्ट होते. विलेनाच्या खजिन्यातील या कलाकृती जवळपास ख्रिस्तपूर्व 1400 ते 1200 कालखंडातील असल्याचे मानले जाते. त्यावेळी इबेरियन लोहयुगाची सुरुवात झाली होती.
प्राचीन आयबेरियन लोकांचे वैशिष्ट्या
प्राचीन आयबेरियन लोक उल्कापिंडाशी परिचित झाले होते हे या शोधातून स्पष्ट होते. या लोकांनी धातूची ओळख पटवत त्याला धार्मिक किंवा प्रतिकात्मक महत्त्व प्रदान केले. त्यांनी प्रारंभिक अवस्थेतच धातूला आकार देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले होते. आयबेरियन लोक केवळ पृथ्वीवर असलेल्या साधनसामग्रीपुरती मर्यादित नव्हते हे देखील यातून समोर येते.
उल्कापिंड लोहाचा वापर
इतिहासात अन्य ठिकाणीही उल्कापिंडाने निर्मित वस्तू मिळाल्या आहेत. इजिप्तच्या तूतनखामेनचा खंजीर प्राचीन चीन आणि मेसोपोटामियात उल्कापिंड लोहाने निर्मित शस्त्र होते. तर विलेनाचा हा शोध स्पेनच्या प्राचीन समाजांमध्येही उल्कापिंडाच्या धातूला धार्मिक, अनुष्ठानिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून विशेष मानले गेल्याचे दर्शवितो. या वस्तूंच वापर समाजाच्या श्रीमंत वर्गाकडून केला जात असण्याची शक्यता आहे.
वैज्ञानिक विश्लेषणाची पुष्टी
या शोधाला योग्यप्रकारे तपासण्यासाठी मास स्पेक्ट्रोमेट्री यासारख्या आधुनिक शास्त्राrय तपासणीचा वापर करण्यात आला. स्पेनच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे तज्ञ साल्वाडोर रोविरा-लोरेन्स यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या विश्लेषणांनी या वस्तूंच्या उत्पत्तिला स्पष्ट पेले, ज्यात निकेलचे अत्याधिक प्रमाण होते तसेच कोबाल्टही आढळून आले आहे.









