19 व्या शतकातील गोष्ट पाहून थक्क
आमचा इतिहास एक तर आमच्या आसपास अवशेषांमध्ये अस्तित्वात आहे किंवा जमिनीत गाडलेल्या स्थितीत आहे. पुरातत्व तज्ञांना उत्खनन करताना अनेक प्राचीन गोष्टी सापडत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. अलिकडेच अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये असाच प्रकार घडला आहे. येथे एका रस्त्याचे काम सुरू असताना अचानक रस्त्याखाली दफन एक अशी गोष्ट मिळाली जी सुमारे 200 वर्षे जुनी आहे. ही काही छोटी-मोठी वस्तू नसून एक लाकडी नौका आहे.

पुरातत्वतज्ञांना फ्लोरिडामध्ये 19 व्या शतकातील नौका जमिनीत सापडली आहे. फ्लोरिडा डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनने याविषयी माहिती दिली आहे. साउथईस्टर्न आर्कियोलॉजिकल रिसर्चच्या पुरातत्वतज्ञांनी ही नौका 19 व्या शतकातील असल्याची माहिती दिली आहे. स्टेट ट्रान्सपोर्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये नौकेची संरचना अद्याप सुरक्षित असल्याचे दिसून येते.
इंजिनियर एका रस्तेनिर्मिती प्रकल्पावर काम करत असताना त्यांना जमिनीत लाकडाचे तुकडे आढळून आले. अधिक खोदकाम केले असता त्यांना नौकेचा आकार देखील मिळाला. ही नौका 200 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.y67 लाकडाने तयार करण्यात आलेली ही नौका सुमारे 20 फूट लांबीची आहे.
या नौकेचा मासेमारीसाठी वापर केला जात असावा किंवा सर्वसामान्य व्यापाराकरता देखील ही वापरली जात असावी असा अनुमान वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. पथकाला संबंधित ठिकाणी जुनी चामड्याची पादत्राणे आणि अनेक गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. याचबरोबर काही लोखंडी तुकडेही आढळून आल्याची माहिती पुरातत्व तज्ञांनी दिली आहे.









