आनंद महिंद्रांना आवडली संकल्पना
भारतात तंत्रज्ञानाचे क्षेत्र वेगाने विस्तारत चालले आहे. अनेक कंपन्या स्मार्ट गॅजेट्स तयार करून लोकांना आकर्षित करत आहेत. आतापर्यंत डिजिटल वॉचपासून अशा अनेक गोष्टी बाजारात उपलब्ध झाल्या आहेत, ज्या लोकांच्या दैनंदिन जीवनाला सुलभ करत आहेत. कार, बाइक किंवा सायकलला देखील उत्तम लुक, फीचर्ससह सादर करण्यात येत आहे. अलिकडेच आयआयटी पवईच्या विद्यार्थ्यांनी असेच एक अनोखे इनोवेशन करून दाखविले आहे.

इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाइक तयार केली आहे. या सायकलला पाहून महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा देखील चकित झाले आहेत. त्यांना ही संकल्पना अत्यंत आवडलयाने त्यांनी फोल्डेबल ई-बाईक निर्मिती करणाऱ्या स्टार्टअपमध्येच गुंतवणूक केली आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी स्वत:च्या अधिकृत एक्स अकौंटवर छायाचित्रे शेअर करत दिली आहे. त्यांची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.
आयआयटी पवईच्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आम्हाला गर्वाची अनुभूती करविली आहे. त्यांनी फुल साइज व्हील्स असणारी जगातील पहिली फोल्डेबल डायमंड फ्रेम ई-बाइक तयार केली आहे. ही अन्य फोल्डेबल बाइकच्या तुलनेत 35 टक्के अधिक उपयुक्त आहे. तसेच अधिक वेगावर ही बाइक स्थिरता देखील प्रदान करते. या सायकलचा वापर ऑफिसर परिसरात फिरण्यासाठी करणार आहे. मी या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हॉर्नबॅक ई कॉमर्स वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असल्याची माहिती आनंद महिंद्रा यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये दिली आहे.
महिंद्रा यांच्या या पोस्टला आतापर्यंत 1 दशलक्षापेक्षा अधिक ह्यूज मिळाले आहेत. ही सायकल कमालीची असून ती खरेदी करण्यासाठी अधिक प्रतीक्षा करू शकत नसल्याचे एका युजरने म्हटले आहे. या सायकलची किंमत 45 हजार रुपये असल्याचे एका युजरने नमूद केले आहे.









