संपूर्ण जगाला आयएस या दहशतवादी संघटनेने अजगरी विळखा घातला होता. मात्र त्या-त्या देशाच्या तपास यंत्रणांनी त्यांच्या देशातून आयएसची पाळेमुळे उखडण्यास सुरूंवात केली. यामुळे आयएसच्या कारवायांना बऱ्यापैकी आळा घालण्यात यश आले आहे. देशातही एनआयएने आयएसच्या भस्मासुराला वेळोवेळी सुरूंग लावल्याने, आयएसचे देशात फावले नाही. नेमके अशाच प्रकारचा सुऊंग एनआयएने पुन्हा एकदा आयएसला लावला आहे.

आयएस या दहशतवादी संघटनेचे अनेक चेहरे आहेत. कधी आयएस (इस्लामिक स्टेट), कधी आयएसआयएस (इस्लामिक स्टेट सिरीया) तर कधी आयएसआयएल (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड लेव्हण्ट) या सर्व संघटना जगातील अनेक देशात सक्रीय आहेत. सध्या आयएसने सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात जम बसविला आहे. तेथील यादवी युद्धाचा फायदा उचलित आयएसने त्याठिकाणी आपले बस्तान बसविले आहे. तर संपूर्ण जगातून आयएससाठी मोठ्या प्रमाणात तरूणांची भरती सुरूं आहे. अशाच प्रकारची भरती राज्यात सुरूं असल्याची माहिती एनआयएला मिळताच, त्यांनी तत्काळ कारवाई करीत आयएसच्या भस्मासुराला सुऊंग लावला. मात्र तपासाअंती पकडल्या गेलेल्या संशयीतांनी मोठ्या प्रमाणात आयएसमध्ये तरूणांचे ब्रेन वॉश करीत भरती करण्याचा सपाटा सुरूं केला होता असे दिसून आले.
मुंबई आणि पुणे येथे एनआयएने छापेमारी करीत आयएसच्या मॉड्युलचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी चौघांना अटक केली. तर येथून मोठ्या प्रमाणात इस्लामिक साहित्य जप्त केले. देशांत मोठ्या प्रमाणांत आयएसमध्ये तरूणांची भरती करीत, त्यांना प्रशिक्षणासाठी सिरियाला पाठवून त्यांच्याकरवी देशात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा मनसुबा पुढे आला आहे. वास्तविक आयएस या दहशतवादी संघटनेचा इतिहास पाहिला तर या संघटनेने जगातील अनेक देशांत मोठ्या प्रमाणांत धुमाकुळ घातला आहे. 2015 साली ऑस्टेलियाची राजधानी असलेल्या सिडनी शहरात आणि पाकिस्तानातील पेशावरमधील एका शाळेत 26/11 हल्यासारखा थरार सुरूं झाला होता. या हल्यादरम्यान
कॅफेमध्ये दहशतवाद्यांनी 50 नागरिकांना तर पेशावर येथील शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना ओलिस ठेवल्याने, या नागरिकांची सुखऊप सुटका करण्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने संपूर्ण पोलीस फौज तर पाकिस्तानने संपूर्ण आर्मी रणांगणात उतरविली होती. सिडनीतील हल्यादरम्यान या दहशतवाद्यांनी काळे झेंडे दाखविल्याने, प्रथम हा हल्ला आयएस या दहशतवादी संघटनेचा तर नाही ना? अशी धास्ती सर्व राष्ट्रांना होती. कारण इसिसने जगात सर्व ठिकाणी आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यास सुऊवात केली होती. यादरम्यान, आयएसचा नुकताच जन्म झाला होता. आयएसचा प्रमुख अबु अल बगदादी आणि अबु अल हुसैन अल कुरेशी यांनी आयएसची दहशत आणि धास्ती वाढविण्यासाठी संपूर्ण जगातील अनेक राष्ट्रात मोठ्या प्रमणात हल्ले करण्यास सुऊवात केली होती. यासाठी त्यांनी अनेक देशातील तरूणांचे ब्रेन वॉश करीत त्यांची भरती करण्यास सुऊवात केली होती. नेमके यादरम्यान राज्यातील प्रथमच चौघेजण आयएसमध्ये भरती होण्यासाठी गेल्याची बातमी बाहेर आल्याने, संपूर्ण देशात खळबळ माजली होती. कल्याण मधील चौघे जण इराकला गेल्यानंतर त्यातील एकजण येथील दाहकता पाहून परत फिरला.
तर आयएसमधील मौलवींच्या संपर्कात असलेल्या अनिस अन्सारी या अभियंत्याच्या एटीएसने त्यादरम्यान मुसक्या आवळल्या. यामुळे शहर तसेच देशात सध्या आयएसचा जास्त धोका नसल्याचे तपास यंत्रणांना वाटत असतानाच, इराकमध्ये गेलेला कल्याणमधील आरिफ माजीद तपास यंत्रणांच्या मदतीने शहरात आला. यावेळी आरिफच्या चौकशीतून बाहेर आलेली माहिती आणि आयएसचा ट्विटर हँडलरला बेंगळूरमधून केलेली अटक, त्याचप्रमाणे शहरातील कित्येक तरूण आयएसच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत असल्याने, आयएसने शहरासह संपूर्ण देशालाच अजगरी विळखा घातल्याचे परखड सत्य समोर आल्याने तपास यंत्रणा देखील हादऊन गेल्या होत्या. देशातील आयसची पाळेमुळे खणून काढण्यासाठी तपास यंत्रणांनी सुरूंवात केली असतानच, इराकहून परतलेल्या आरिफच्या चौकशीतून धक्कादायक म]िहतीचा खुलासा सुरूं होता. आयएसकडे देशातील उच्चशिक्षित तरूण वळत असल्याने, तपास यंत्रणांसमोर या तरूणांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहीले होते. यादरम्यान आयएसने ट्विटरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरूणांचे ब्रेन वॉश करण्यास सुरूंवात केली होती. विशेष म्हणजे आरिफच्या चौकशीत इराकमध्ये असताना आयएसचे ट्विटर अकाऊंट देशातून हँडल होत असल्याची माहिती समोर आली होती. यावेळी तपास यंत्रणांनी तत्काळ आयएसचा ट्विटर हँडलर मेहदी बिस्वास याला अटक केली. दिवसा नोकरी आणि रात्री आयएसकरीता ट्विटर हँडलिंग असे मेहदीचे काम सुऊ होते. मात्र मेहदीच्या अटकेची बातमी मिळताच, आयएस पेटून उठली होती. मात्र तपास यंत्रणांनी देशाची सुरक्षा एवढी चोख ठेवली होती की, आयएसच्या दहशतवाद्यांचा केवळ देशाबाहेरच थयथयाट सुऊ होता. तर दुसरीकडे आरिफच्या सर्वच माहितीवर एनआयए विश्वास ठेऊ शकत नाही. कारण एनआयएला गुमराह करण्यासाठी आरिफ कोणतीही माहिती देण्याची शक्यता होती.
यादरम्यान, राज्य एटीएस सक्रीय होत त्यांनी कल्याण, भिवंडी आणि पनवेल या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले होते. त्याअनुषंगाने एटीएसने 480 जणांची चौकशी केली होती. यामध्ये उच्चशिक्षित तरूणांसह नवी पनवेल येथील महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकाचा देखील समावेश होता. या सर्वांना एटीएसने यापूर्वीच ताब्यात घेतले होते. नेमकी 2015 सारखीच परिस्थिती आता समोर आली आहे. यावेळी देखील एनआयए या सर्वांवर नजर ठेवून होती. यामुळे मुंबई, ठाणे, पुणे येथे छापा माऊन संशयीताना अटक करण्यात यश मिळाले. या सर्वांच्या चौकशीदरम्यान, केवळ एकच बाब समोर येत आहे ती म्हणजे धर्मयुद्धासाठी प्रेरीत करण्यासाठी या तरूणांना सिरियाला पाठविण्याचे काम येथील धर्मवेडे करीत आहेत. याकरीता लागणारा अमाप पैसा धर्माच्या नावाखाली धनदांडग्याकडुन उकळला जात आहे. धर्माच्या नावाखाली पैसा देणाऱ्यांची देखील काही कमी नाही. जिहादी युद्धाकरीता देखील उच्चशिक्षित असलेले तरूण वेडे झाले आहेत. आपल्या सर्वस्वाचा पूर्ण विसर पडलेले हे धर्मवेडे तरूण जिहादच्या नावाखाली आगीत उडी घेऊन होरपळत आहेत. मात्र त्यांच्या अनुभवावऊन देखील इतर तरूण काही शिकत नसल्याची शोकांतिका आहे.
– अमोल राऊत








