अनेक देशांमध्ये ट्रकचालकांची कमतरता
जर उत्पन्नाचा शिक्षण अन् पदवीशी संबंध असतो असा विचार चुकीचा नाही. परंतु विदेशातील स्थिती पाहून तुमचा यासंबंधीचा दृष्टीकोनच बदलून जाईल. पैसे कमाविण्यासाठी शिक्षण जितके आवश्यक आहे, तितकेच माणसाने एखाद्या कौशल्यात परिपूर्ण असण्याची गरज आहे. योग्यप्रकारे काम केल्यास ट्रक अन् टॅक्सी चालविणाऱयांसमोर डॉक्टर अन् इंजिनियरांचा पगारही कमी पडू शकतो.
आमच्या देशात ट्रकचालकांचे उत्पन्न फारसे नसले तरीही जगातील काही देशांमध्ये कॉर्पोरेट जॉब्सपेक्षा अधिक कमाई ड्रायव्हिंग करून केली जाते. अशा देशांमध्ये स्वीडनचा समावेश असून तेथे ट्रकचालकाचे वार्षिक वेतन सहजपणे 33 लाख किंवा त्याहून अधिक असते.
कॅनडात जाऊन टॅक्सी ड्रायव्हर होण्याच्या लोकांच्या स्वप्नाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कॅनडात ड्रायव्हिंग करून सहजपणे लोक 33-34 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकतात. त्यातही ट्रकचालकांची मागणी तेथे खूपच अधिक आहे.

नेदरलँड सारख्या युरोपीय देशातही ट्रकचालकांना मोठी मागणी आहे. या देशात शेती मोठय़ा प्रमाणात हाते असल्याने ट्रकचालकांची मोठी आवश्यकता भासते. सर्वसाधारणपणे तेथे एक ट्रकचालक 36 लाखाहून अधिक रक्कम वर्षभरात कमावू शकतो.
जर्मनीतही ही स्थिती आहे. जर्मनी देखील ट्रकचालकाला 35 लाख रुपयांहून अधिक वार्षिक उत्पन्न मिळत असते. या देशात ट्रकिंग एक उत्तम पेशा आहे. नॉर्वेमध्ये ट्रक ड्रायव्हिंग करणाऱयांना सहजपणे 37 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते. परंतु नॉर्वे हा देश वास्तव्यासाठी अत्यंत महाग मानला जातो. बेल्जियममध्ये ट्रकचालकांचा पगार अधिकच वाढतो या देशात या पेशाद्वारे 39 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न मिळविता येते.
ऑस्ट्रेलिया हा देश स्वतःच्या हाय सॅलरी जॉब्ससाठी चर्चेत असतो. येथे ट्रकचालकांचा वार्षिक पगार 42 लाख रुपयांपर्यंत असू शकतो. ट्रकचालकांना सर्वाधिक पगार देणारा देश म्हणून स्वीत्झर्लंडला ओळखले जाते. या पर्यटनासाठी प्रसिद्ध देशात ट्रकचालकांना 51 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते.









