सावंतवाडी / प्रतिनिधी-
ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील गोविंद नाट्य मंदिर समोरील मुंबई-गोवा महामार्गावर घडला. जखमी दुचाकीस्वाराला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.एकनाथ अंकुश पाटकर रा. तेंडोंली, कुंभारवाडी ता. कुडाळ असे जखमीचे नाव आहे.याप्रकरणी ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे .









