झाडात एकाचवेळी राहू शकतात 40 लोक
हे जग अत्यंत विचित्र आहे. जर तुम्ही सभोवताली नजर फिरविली तर तुम्हाला अनेक अनोख्या गोष्टी दिसून येतील. जगात काही अशा गोष्टी देखील आहेत, ज्या पाहिल्यावर माणूस आश्चर्यचकित होत असतो. असाच एक वृक्ष सध्या चर्चेत असून त्याचे मोठे खोड अन् पाणी साठवण्याची क्षमता चकित करणारी आहे.
जगात अनेक प्रकारचे वृक्ष असतात, परंतु काही वृक्ष स्वत:चा आकार अन् वैशिष्ट्यांमुळे चर्चेत राहतात. काहीसा बाओबाब वृक्ष असाच आहे. एखादा वृक्ष स्वत:च्या खोडामध्ये 17 हजार लिटरपर्यंत पाणी साठवू शकतो हे तुम्ही कधी ऐकले आहे का? जगात आढळणारा बाओबाब वृक्ष असे करू शकतो. बाओबाब वृक्षाला बोआब, बोतल वृक्ष किंवा उलटा वृक्ष देखील म्हटले जाते. अरबी भाषेत याला बु-हिबाब नावाने ओळखले जाते, याचा अर्थ अनेक बिज असणारा वृक्ष असा होतो. खासकरून आफ्रिकेत आढळून येणाऱ्या या वृक्षाला द वर्ल्ड ट्रीच्या उपाधीने गौरविण्यात आले आहे. या वृक्षाचे वैशिष्ट्या म्हणजे यावर केवळ वर्षातील 6 महिनेच पानं असतात.
बाओबाब वृक्ष जवळपास 30 मीटर उंच आणि 11 मीटर रुंद असतो. सर्वसाधारणपणे या वृक्षात भरून राहिलेले पाणी इतके शुद्ध असते की ते पिले जाऊ शकते. तर पावसाच्या अबावी या वृक्षातील पाण्याचा वापरही केला जातो. जर कुठल्याही प्रकारचे नुकसान न पोहोचल्यास हा वृक्ष सुमारे 6 हजार वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो असे बोलले जाते. याच्या सालीत 40 टक्क्यांपर्यंत ओलावा असतो, याचमुळे हे पेटविता येत नाही. परंतु याद्वारे ब्लँकेट, कागद, कपडे, मासेमारीचे जाळे आणि दोरखंड तयार केले जातात.









