दररोज दहा-पंधरा रोपट्यांना पाणी : जोतिबा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : पिरनवाडी पाटील गल्लीतील रहिवासी जोतिबा सुरेश पाटील हे वृक्षप्रेमी आहेत. ते परिसरातील रस्त्याच्याकडेला लावलेल्या सुकणाऱ्या झाडांना पाणी घालत असतात. रोज दहा ते पंधरा झाडांच्या रोपट्यांना पाणी घालत असतात. रस्त्याच्याकडेला पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वेचून त्यामध्ये पाणी भरून त्या बाटलींना बारीक छिद्र करून त्या लहान झाडांना जगविण्याचा प्रयत्न ते करीत असतात. य् ाावर्षी वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने उष्णतेचा पारा 40 अंशापर्यंत पोहचला आहे. पाण्याची नागरिकांना सर्वत्र टंचाई भासत आहे. त्यातच ठिकठिकाणीं रस्त्याच्याकडेला लावलेली रोपटी सुकण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी आपण खारिचा वाटा उचलावा म्हणून दररोज दहा ते पंधरा रोपट्यांना जगविण्यासाठी प्रयत्न करत असतो, असे जोतिबा सुरेश पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्येक नागरिकांनी आपल्या नजिकच्या झाडाच्या रोपट्यांना जगविण्यासाठी पाणी घालून पर्यावरणाला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.









