कन्नूर : केरळच्या कन्नूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे एका एक्स्प्रेस रेल्वेच्या डब्यात आग लागली आहे. या दुर्घटनेवेळी रेल्वे स्थानकावर थांबली होती. ही रेल्वे प्लॅटफॉर्म तसेच भारत पेट्रोलियमच्या फ्यूल डेपोपासून काही मीटर अंतरावर रेल्वेमार्गावर उभी होती. दुर्घटनेपूर्वी सर्व प्रवासी खाली उतरले असल्याने जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाने तेथे धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळविले आहे. तर आगीमागील कारणांचा शोध तपास अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. याकरता फोरेन्सिक विभागाची मदत घेण्यात येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









