मालवण – :
तारकर्ली समुद्रात आंघोळीसाठी गेलेला विनायक पुंडलिक लोहार (३२ रा. चंदगड गुडेवाडी) या पर्यटकाला बुडताना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. पण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. चंदगडहून पंधरा जणांचा ग्रुप बुधवारी सायंकाळी पर्यटनासाठी तारकर्लीत आला होता. यावेळी ६.३० वाजताच्या दरम्याने ही घटना घडली. तारकर्लीतील वैभव सावंत आणि इतर स्थानिक रहिवाशांनी पर्यटकाला समुद्रातून बाहेर काढले.









